विभावरी शिरुरकर : हिंदोळ्यावर

80.00 Original price was: ₹80.00.64.00Current price is: ₹64.00.

Fiction

Hindolyavar (हिंदोळ्यावर) – Vibhavari Shirurkar (विभावरी शिरुरकर)

काही काही लेखक आपल्या काळाच्या पुढे असतात. विभावरी शिरुरकर या त्यांपैकी एक.
‘हिंदोळ्यावर’ ही त्यांची कादंबरी पन्नास वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली आहे हे ती नव्याने वाचताना खरेही वाटत नाही. परित्यक्त ‘अचले’च्या मनातील सगळी आंदोलने तिच्यात इतक्या स्वाभाविक आवेगाने उमटलेली आहेत की अचला अजूनही तितकीच ‘तरुण’ राहिलेली आहे.
आयुष्य नाकारण्यात ‘अचले’ला समाधान नाही आणि ते स्वीकारण्यातील सुखही तिला सुख म्हणून घेणे शक्य नाही. त्रिशंकूसारखे तिचे जगणे तिला जीवनलढ्याचा तीव्रतेने अनुभव देते; त्यात ती पराभूत होत नाही आणि विजयीही होत नाही. आपल्या लक्षात राहते ते तिचे स्वतःच्या मनातील विचारशरांनी स्वतःला सतत विव्हळ करणे.…
…. आता ‘हिंदोळ्यावर’च्या लेखिकेच्या नावागावाचे गूढ मनात नाही; श्लील-अश्लीलतेची भीती नाही; आता गूढ आहे ते फक्त एकाच गोष्टीचे! कुठल्याही ‘जिवंत’ व्यक्तिमत्त्वाच्या माणसाचे जीवन आपल्या समाजात तिला पोखरून टाकणाऱ्या आंतरिक संघर्षाखेरीज का जात नाही? गतिमानतेतच ‘हिंदोळ्याचे’ जीवंतपण; पण गतिमानतेशी आपले एवढे वैर कशासाठी?

ISBN: 81-7185-221-1

Number of pages: 130

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2004

Weight 0.120 kg
Dimensions 4.75 × 7 cm