वसंत आबाजी डहाके : मराठी समीक्षेची सद्य:स्थिती

275.00 Original price was: ₹275.00.220.00Current price is: ₹220.00.

Non-Fiction

Vasant Abhaji Dahake (वसंत आबाजी डहाके) – Marathi Sameekshechi Sadyasthiti (मराठी समीक्षेची सद्य:स्थिती)

साहित्यकृती, कलाकृती नियंत्रणाच्या बाहेर जाण्याचा सतत प्रयत्न करीत असते. केवळ वाङ्मयीन रूपबंधाच्या चौकटीतून सुटण्याचा तो प्रयत्न नसतो. संस्थात्मक चौकटीतून सुटण्याचाही असतो. बहुतांश लेखन वा कलानिर्मिती बांधिलकीतूनच होत असते. ही बांधिलकी आणि समाजातील संस्थांनी लादलेले आविष्कारनियंत्रण यांत द्वंद्वात्मक संबंध असतो. व्यक्तिकेंद्री, आत्मकेंद्री आणि समूहकेंद्री, समाजकेंद्री या संज्ञांचा पुष्कळसा एकारलेपणाने अर्थ लावला जात असतो. समूह, समाज म्हणजे वास्तवात संस्थांत रूपांतरित झालेले गट. व्यक्ती बहुधा संस्थात्मक गोष्टींच्या विरोधात असते. सगळीकडच्या लेखकांचा, कलावंतांचा, शास्त्रज्ञांचा इतिहास पाहिला तर असे दिसते की, व्यक्तींचे तोंडवळा नसलेल्या गळ्यात रूपांतर करणाऱ्या समाज किंवा तत्सम नावाच्या गोष्टीला ते विरोध करतात. समूहाला चेहरा नसतो; समूहातील व्यक्तीला असतो. कलेसाठी कला की जीवनासाठी कला अशा भ्रामक वादांनंतर व्यक्तिवादी/समष्टिवादी, आकृतिवादी/आशयवादी असे भ्रामक वाद उपस्थित झाले. एकीकडे कलावंताची सामाजिक बांधिलकी त्याच्या लेखनात अनुस्यूत असतेच, तर दुसरीकडे समाजाचे, म्हणजे संस्थांचे, आविष्कारनियंत्रण असते. साहित्यसमीक्षा अथवा कलासमीक्षा बांधिलकीबरोबरच अशा नियंत्रणाचाही निर्देश करीत असते.
प्रस्तुत ग्रंथात मराठी साहित्यसमीक्षेचे परिदृश्य आकारत असताना साहित्यासमोर आणि साहित्यसमीक्षेसमोर कोणते प्रश्न उपस्थित होत गेले व होत आहेत यांचाही निर्देश आढळेल.

ISBN: 978-81-7185-852-1

Number of pages: 294

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2011