लीळाचरित्रातील समाजदर्शन – सुमन बेलवलकर

675.00 Original price was: ₹675.00.540.00Current price is: ₹540.00.

Non-Fiction

Leelacharitratil Samajdarshan (लीळाचरित्रातील समाजदर्शन) : Suman Belwalkar (सुमन बेलवलकर)

लीळाचरित्र’ हा मराठीतील आद्य चरित्रग्रंथ. महानुभाव संप्रदायाचे संस्थापक श्री चक्रधर यांच्या आयुष्यातील एकंदर लीळा गोळा करून नागदेवाचार्यांकडून तपासून घेऊन म्हाइंभट्टांनी संशोधित-संकलित स्वरूपात सिद्ध केलेला हा प्रमाणभूत ग्रंथ. सत्यनिष्ठेच्या कसोटीमुळे विश्वसनीय ठरलेला हा ग्रंथ म्हणजे महानुभावीय वाङ्मय आणि तत्त्वज्ञान यांचा मूलाधार आहे. श्रीचक्रधर व त्यांचा महानुभाव संप्रदाय यांच्यासंबंधीची वैविध्यपूर्ण माहिती तर ‘लीळाचरित्रा’तून मिळतेच, त्याशिवाय चक्रधरांच्या पदयात्रेच्या निमित्ताने भेटणाऱ्या अनेक व्यक्ती व स्थळे यांचा परिचयही त्यातून घडतो. तत्कालीन राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक जीवन इत्यादींविषयीचे तपशीलदेखील या ग्रंथातून उपलब्ध होतात. या सर्वांमुळे ‘लीळाचरित्रा’ला यादवकालीन सामाजिक-सांस्कृतिक दस्तऐवजाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. हे ओळखून सुमन बेलवलकर यांनी प्रस्तुत ग्रंथात ‘लीळाचरित्रा’चा सामाजिक दृष्टिकोणातून सविस्तर व सप्रमाण अभ्यास मांडला आहे. ‘लीळाचरित्रा’चे पंथीय तसेच साहित्यिक दृष्टिकोणातून अनेक मान्यवरांनी केलेले अभ्यास आपल्याला ठाऊक आहेत. तथापि ‘लीळाचरित्रा’चा सामाजिकदृष्टीने केला गेलेला मराठीतील हा पहिला सखोल अभ्यास आहे. ‘लीळाचरित्रा’चे स्वरूप व रचनापद्धती यांपासून ‘लीळाचरित्रा’तून आढळणाऱ्या धार्मिक-सामाजिक जीवनापर्यंत आणि ‘लीळाचरित्रा’ तून प्रकटणाऱ्या इतिहास-भूगोलापासून ‘लीळाचरित्रा’च्या भाषेपर्यंत सर्व घटकांचा सामाजिक दृष्टिकोणातून बेलवलकर यांनी घेतलेला परामर्श अत्यंत व्यासंगपूर्ण आहे. ‘लीळाचरित्रा’च्या आजवरच्या अभ्यासात पडलेली ही मोलाची भर आहे.

– विलास खोले

ISBN: 978-81-7185-955-9

Number of pages: 392

Language: Marathi

Year of Publication: 2009

Dimensions 7 × 9.5 cm