रौंदाळा : कृष्णात खोत

275.00 Original price was: ₹275.00.220.00Current price is: ₹220.00.

Fiction

Krishnat Khot (कृष्णात खोत) – Raundala (रौंदाळा)

खेड्यात राहणाऱ्या माणसाला राजकारणविरहीत राहताच येत नाही. याचे अनेक वस्तुपाठ कृष्णात खोत या कादंबरीत उभे करतात. अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरज यांच्याएवढी राजकारणाची निकड आज गावागावात जाणवते आणि गावाचं गावपण हरवण्याबरोबर माणसाचं माणूसपणही संपवून टाकते, याचं सूक्ष्म चित्रण खोतांची लेखणी व्यक्ती-व्यक्तींच्या वागण्या-बोलण्यातून वाचकाला घडवते. सगळा गावच या कादंबरीत आपल्याला दिसतो. प्रत्येक लोकप्रतिनिधीला आणि सर्वांनाच घराघरातले वाद चव्हाट्यावर आलेले, त्याचे केलेले राजकारण सुन्न करून सोडते. हा सगळा बदलत्या गावाचा दस्तऐवज लेखक आपल्या चित्रमय शैलीत मांडतो, वाचक अस्वस्थ होत जातो. खेड्याचं भीषण वास्तव थक्क करायला लावतं. जुन्यातलं चांगलंही चुरगळून, चोळामोळा करून एक नवीन, पण बकाल खेडं समोर येतं. कादंबरीतल्या आबासारख्या माणसाला सगळा अंधार आणि अंधार भरलेला दिसतो. हे वास्तव खोतांच्या सूक्ष्म निरीक्षणातून उलगडत जाते. गाव नायक असलेली ही कादंबरी अनागर समूहाचा या दशकातला एक सामाजिक दस्तऐवजच ठरते.

ISBN: 978-81-7185-962-7

Number of pages: 300

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2011