रेखाचित्रविचार : सुधीर पटवर्धन / रणजित होस्कोटे ; अनु. दिलीप रानडे

400.00 Original price was: ₹400.00.320.00Current price is: ₹320.00.

Non-Fiction

Rekhachitravichar (रेखाचित्रविचार) : Sudhir Patwardhan / Ranjit Hoskotet ; Ed. Dilip Ranade (सुधीर पटवर्धन / रणजित होस्कोटे ; अनु. दिलीप रानडे)

कवी, कला समीक्षक आणि अधिरक्षक (क्यूरेटर) म्हणून रणजित होस्कोटे सुप्रसिद्ध आहेत. आजवर त्यांनी वीसहून अधिक पुस्तकं लिहिली असून Vanishing Acts: New & selected Poems (१९८५-२००५), Lalla: The poems of Lal Ded हे त्यांचे कवितासंग्रह लोकप्रिय आहेत. त्यांनी काही कवितासंग्रहांचं संपादनही केलं आहे. त्यांनी नऊ चित्रकारांची आत्मचित्रं लिहिली असून सुधीर पटवर्धन यांच्यावरील दोन पुस्तकं प्रसिद्धच आहेत. प्रत्येक चित्रकाराशी अभ्यासपूर्ण संवाद साधून त्याच्यावर लेखन करण्याची रणजित होस्कोटे यांची खासियत आहे. चोपन्नाव्या व्हेनिस बेनाले या भारतात प्रथमच आयोजित केलेल्या चित्रप्रदर्शनाचे ते अधिरक्षक होते. एशिया आर्ट अर्काईव्ह, हाँगकाँग या संस्थेच्या शैक्षणिक सल्लागार समितीवर त्यांची नेमणूक झाली असून, नॉर्वे इथं आयोजित पहिल्या बर्गन ट्रेनियलचे सल्लागार सदस्य म्हणूनही ते काम पाहत आहेत.
— रणजित होस्कोटे

दिलीप रानडे यांचा जन्म मुंबईचा असून सर जे.जे. स्कूल ऑफ आर्मधून त्यांनी ड्रॉईंग आणि पेटिंगचा डिप्लोमा घेतला. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयातून नोकरी करीत असताना त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. संग्रहालयशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी १९८४ साली इंडो-युएस सबकमिशनची त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. १९७२ ते २०११ या कालावधीतील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समूह प्रदर्शनांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्याचप्रमाणे १९७८-२०१२ या काळात त्यांच्या चित्रांची अनेक स्वतंत्र प्रदर्शनंही झाली आहेत. विविध कलासंस्थांमध्ये त्यांनी दिलेली ‘व्यक्तिचित्रण प्रकार व गुणवैशिष्ट्ये’, ‘माय आर्ट’, ‘स्वातंत्रोत्तर भारतीय कला’ या विषयांवरील त्यांची व्याख्यानं अभ्यासपूर्ण ठरली आहेत. रोटरी क्लब ऑफ बॉम्बेतर्फे २०११ साली ‘व्होकेशनल एक्सलन्स’ हा सन्मान दिलीप रानडे यांना प्राप्त झाला आहे.
— दिलीप रानडे

ISBN: 978-81-7185-542-2

Number of pages: 152

Language: Marathi

Cover: Paperback with Flap

Year of Publication: 2024