रियाजाचा कानमंत्र : यशवंत देव

140.00 Original price was: ₹140.00.112.00Current price is: ₹112.00.

संगीत

Sold out

Out of stock

Category:

Riyajacha Kanmantra (रियाजाचा कानमंत्र) – Yashwant Dev (यशवंत देव)

सुगम संगीताला ‘लाइट म्युझिक’ म्हणताना हा विषय बऱ्याच वेळा अगदी ‘लाइटली’ घेतला जातो. पण खरं तर तो एक गंभीर विषय आहे. आणि त्याचा तेवढ्याच गंभीरपणे विचार करणं आवश्यक आहे. ‘रियाजाचा कानमंत्र’ या पुस्तकामध्ये ह्या विषयाचं गांभीर्य उकलून दाखवलं आहे.

आपलं गाणं, आपला आवाज सुधारावा म्हणून गायक आपल्या परीनं प्रयत्न करतो, पण अनेकदा त्या प्रयत्नांनी आवाज आणि गाणं अधिकच बिघडून गेल्याचा प्रत्यय येतो. याचं मुख्य कारण म्हणजे रियाजाची चुकीची पद्धत. योग्य तन्हेनं रियाज करण्यासाठी प्रथम आपला उच्छवास योग्य तन्हेनं बाहेर टाकायला शिकलं पाहिजे. कारण आपला श्वास आपण चुकीच्या पद्धतीनं बाहेर टाकतो म्हणून आपल्या गाण्यात अनेक अडथळे येतात. हे अडथळे कोणत्या पद्धतीनं दूर करावेत? आपलं गाणं उत्साहपूर्ण, निर्भय आणि निःशंक कसं बनेल? गाण्यावर असलेलं आपलं प्रेम, मुक्तपणे गायलेल्या आपल्या गाण्यातूनच श्रोत्यांच्या प्रत्ययाला कसं येईल? या प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजेत.

अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा कानमंत्र ह्या पुस्तकातील विवेचनाद्वारे संगीत दिग्दर्शक, गायक व गीतकार यशवंत देव यांनी आपल्याला दिला आहे. आपल्या गाण्यातील दोष जाणीवपूर्वक दूर करून जे गाणं आपण गाऊ ते आपल्याला आणि श्रोत्यांनाही थरारून टाकल्याशिवाय राहणार नाही.

ISBN: 978-81-7185-705-0

No. of pages: 87

Year of Publication: 1996