Ravindra-Veena (रवींद्र-वीणा) – Kaka Kalelkar (काका कालेलकर)
गुरुदेव रवींद्र टागोर हे भारतीय संस्कृतीच्या आध्यात्मिक आणि रसिक परंपरेचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या ‘गीतांजली’चे जागतिक वाङ्मयात विशेष स्थान आहे. रवींद्रबाबूंच्या ‘गीतांजली’चा व आचार्य काकासाहेब कालेलकरांच्या रसिक भाषाशैलीचा मराठी वाचकांना परिचय ‘रवींद्र-मनन’, ‘रवींद्र-वीणा’ आणि ‘रवींद्र- झंकार’या तीन पुस्तकांद्वारे झाला आहे. ‘गीतांजली’तील प्रत्येक गीतात व्यक्त झालेल्या रविबाबूंच्या जीवनतत्त्वज्ञानाची आचार्य कालेलकरांनी आपल्या सोप्या, रसिक मराठी शैलीत मनन लिहून फोड करून दाखविली आहे. त्याशिवाय गीतांतील ज्या ओळी विशेष आवडल्या किंवा महत्त्वाच्या वाटल्या त्यांच्यावर विस्तृत टीपा लिहिल्या आहेत. गीतांची निवड कालेलकरांचे साथी शिवबालक बिसेन हे करत. रवींद्रबाबूंचे गूढ मानले जाणारे तत्त्वज्ञान सोप्या, साध्या भाषेत मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूनेच ही पुस्तके लिहिली गेली आहेत.
प्रस्तुत पुस्तकांत मूळ बंगाली गीत, त्यांतील भाव विशद करणारे मनन, गीताचा स्वैर अनुवाद व कठीण बंगाली शब्दांचे अर्थ देण्यात आले आहेत. बंगाली गीते बंगाली पद्धतीने वाचता यावीत म्हणून बंगाली उच्चारणाचे नियम ‘रवींद्र-मनन’ ह्या पुस्तकात दिले आहेत. रवींद्रनाथ टागोर यांच्या अजोड कलाकृतीचा आनंद अनुभवण्यास व त्यातून जीवनरहस्य पारखण्यास ही तीनही पुस्तके फार महत्त्वाची ठरतात.
ISBN: 978-81-7185-872-9
Number of pages: 144
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: 2010