Rang (रंग) – Kamal Desai (कमल देसाई)
नवकथाकारांच्या पिढीतल्या कमल देसाई या एक आघाडीच्या लेखिका. ‘बाई, सर्व्या घंटा झाल्या!’ या त्यांच्या सुरुवातीच्या कथेनेच जाणत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतरच्या काळात त्यांच्या शैलीचे नवनवे आविष्कार नवकथेच्या घाटाबद्दलच्या मुलभूत जाणिवांत नित्य उत्क्रांती करीत आले आहेत. कथेच्या कथानक रंगरूपाची कल्पनाच गंगाधर गाडगीळांनी बदलून टाकली; परंतु त्यापुढे जाऊन निवेदनाच्या बुडाशी असलेल्या, कालप्रवाहाच्या भूतभविष्यातील चैतन्यशीलतेचा वेध कमल देसाई यांनी घेतला. यामुळेच ‘अनाकलनीय’ असा शेर मारून त्यांच्या कथेचा अव्हेर करण्याऐवजी सुबुद्ध वाचक या कलाकृतीच्या घाटाच्या नावीन्याचे आव्हान स्वीकारीत असतो. अतिशय तीव्र अशा संवेदनक्षमतेतून जन्माला आलेली चिंतनशील, काव्यात्म वृत्ती हीसुद्धा खास कमल देसाईंची आहे. आणि विशेष हे की, त्यांच्या कथेचे हे व्यक्तिमत्त्वसंपन्न घटक प्रत्येक कथेत विनासायास एकजीव झालेले आहेत.
ISBN: 978-81-7185-976-4
Number of pages: 180
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: 2nd ed. 2009