यळकोट – श्याम मनोहर

130.00 Original price was: ₹130.00.104.00Current price is: ₹104.00.
Sold out

Out of stock

Category:

Yalkot

बिनमौजेच्या गोष्टींमधली वेगळीच मौज शोधणारे, आपली स्वतंत्र तिरकस लेखनशैली निर्माण करणारे श्याम मनोहर हे महत्त्वाचे नाटककार. नाट्यतंत्राच्या आहारी न जाता ते मोकळेपणाने पण उपहासाने, वेगळ्या निरीक्षण शक्तीने आशय अधोरेखित करतात. ही मनोहारी शैली नाट्य दिग्दर्शकाला एक आव्हानच ठरते. त्यांची हृदय आणि यळकोट ही दोन नाटकं दिग्दर्शित करण्याची संधी मला मिळाली.

मुंबईला व्यावसायिक रंगभूमीवर एका पाठोपाठ नाटकं करत असतानाच यळकोट नाटक माझ्या हाती आलं. व्यावसायिक प्रायोगिक असा अग्रक्रम किंवा भेदाभेद मी कधीच केला नाही. जे नाटक त्याक्षणी ज्या मंचावर करावंसं वाटलं ते मी बेधडकपणे केलं. यळकोट वाचून मी अक्षरश: उडालोच. यातले संवाद कोणते नटनट्या बोलतील? इनॅक्ट करूशकतील? कुठली संस्था हे नाटक उभं करायला तयार होईल ? हे प्रेक्षकांना रुचेल, झेपेल ? त्यातला वरवरचा बोल्डनेस झटकून टाकून त्याच्या मुळापर्यंत आपल्याला जाता येईल ? असे असंख्य प्रश्न आ वासून उभे राहिले. पण नाटक आतून आवडलं होतं. त्याची काहीतरी अर्थपूर्ण गंमत मला दिग्दर्शक म्हणून खुणावत होती.

दिग्दर्शक म्हणून एका थिएटर गेमच्या पेसने मी जाणीवपूर्वक वेगवान हालचाली आणि कॉम्पोझिशन्स करत करत नाटक गतिमान ठेवलं होतं. शिवाय श्याम मनोहरांच्या अचूक बोलीभाषेकडे, प्रवाहीपणाकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हतंच. गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्टीने यळकोटचे उत्तम प्रयोग झाले.

– चंद्रकांत कुलकर्णी

ISBN: 978-81-7185-439-4

No. of pages: 88

Year of publication: 2016

Weight 0.12 kg
Dimensions 21.59 × 13.97 × 0.6 cm