यकृत : श्याम मनोहर

85.00
Category:

Yakrut

ऐंशीच्या दशकात श्याम मनोहर कथाकार म्हणून मराठी वाचकांसमोर आले. त्यांची कथा प्रयोगशील मानल्या जाणाऱ्या ‘नव’कथेपेक्षा वेगळी होती. कारण त्या नवतेविषयी त्यांना उत्साह नव्हता. त्यांच्या कथेतील वेगळेपण वास्तवाचा तिरकस वेध आणि मानवी अस्तित्वातील असंख्य पेच यांतून निर्माण होत होते. त्या काळातील ही कथा आजही वाचताना आकलनाचे नवे नवे वळसे देते.

अचानक आपण नाटक लिहिले याविषयी एका मुलाखतीत ते म्हणतात, ङ्गनाटक लिहावं असं काही मनात नव्हतं, मी नाटक वाचत नव्हतो की पाहत नव्हतो. पण ‘काल’ या संकल्पनेविषयी मला अनेक प्रश्न पडत होते – त्यावर निबंध तर लिहायचा नव्हता.ङ्घ त्यांनी अनेक प्रश्न उभे करण्यासाठी, माणसे एकमेकांना कशा प्रतिक्रिया देतात ते मांडण्यासाठी नाटक लिहिले. अधिभौतिक प्रश्नांकडे जाण्यासाठी त्यांनी माणसांच्या रोजच्या जगण्यातले रागला रागलोभ वापरले.

मराठी रंगभूमीवरील करमणूक-प्रबोधनात अडकलेली ‘गोष्ट’ मागे टाकून त्यांनी ही ‘कृष्ण सुखात्मिका’ लिहिली. सत्यदेव दुबेंसारखा कोणत्याही चौकटीत न मावणारा दिग्दर्शक मिळाल्याने ‘यकृत’च्या प्रयोगाने प्रायोगिक रंगभूमीलाच विचार करायला लावले. विनोदाची एक गंभीर जातकुळी आपल्याला परिचित झाली.

यानंतरच्या काळात श्याम मनोहर यांनी कादंबरी, नाटक या संहितांमधून स्वतःची अनुभवशोधाची शैली योजली जी त्यांची स्वतःची होती.

ISBN: 978-81-7185-557-5

No. of pages: 70

Year of publication: 1987

Weight 0.095 kg
Dimensions 21.59 × 13.97 × 0.4 cm