मृगजळाचे बांधकाम : ग्रेस

275.00 Original price was: ₹275.00.220.00Current price is: ₹220.00.
Sold out

Out of stock

Mrugajalache Bandhkam (मृगजळाचे बांधकाम) – Grace (ग्रेस)

‘चर्चबेल’, ‘मितवा’ आणि ‘संध्यामग्न पुरुषाची लक्षणे’ या तीन भरघोस ललितबंध-संग्रहांनंतर आलेला ‘मृगजळाचे बांधकाम’ हा संग्रह. ललितबंध स्वतःच्याच आवर्तात गरगरत निर्मितीचा आदिबिंदू शोधू पाहतात. कवीची ही साधना न संपणारी आहे. मृगजळाचा पाठलाग जसा संपत नाही तसा कवी ग्रेस यांचा हा निर्मितिप्रक्रियेचा पाठलागही अनंतच आहे. पण या पाठलागाच्या प्रवासात हे ललितबंध विविध अंगांनी मूर्तरूप धारण करीत आहेत आणि पुनःपुन्हा जीवनातील, निसर्गातील कथा, संचितकथा आणि दंतकथा ह्यांना घुसळून, उसळून पाहताहेत…
‘मृगजळाचे बांधकाम’ या ललितबंध-संग्रहाचे वैशिष्ट्य हे की, यात कवी ग्रेस यांनी प्रथमच निर्मितिप्रक्रियेचा एक सिद्धांत मांडला आहे. निसर्गसत्ता व जीवनसत्ता या दोन्ही सत्तांच्या वर सौंदर्यसत्तेचे अधिष्ठान असते, हा तो सिद्धांत आहे. या सिद्धांताच्या पुष्टीखातर निसर्गसत्तेचे व जीवनसत्तेचे विश्लेषण व वर्गीकरण करीत करीत ग्रेस सौंदर्यसत्तेची मखरमांडणी करतात. क्रौर्य व करुणा या गोष्टींबद्दल ग्रेस यांना खूप कुतूहल आहे. जीवनातील क्रौर्य व करुणा फार दाहक असते, निसर्गातील क्रौर्य व करुणा भयप्रद असते — मग या दोहोंना कवेत घेऊन वर उठणारे सौंदर्यसत्तेतील क्रौर्य व करुणा कोणत्या मखरात मांडावे, हाच कवी ग्रेस यांचा पेच आणि आपलाही. या पेचांच्या पाठलागात आणखीही ललितबंध निर्माण होतील. प्रश्नांची उत्तरे शोधण्याची अखंड प्रक्रिया म्हणजेच मृगजळाचे बांधकाम.

ISBN: 978-81-7185-797-5

Number of pages: 178

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2003