मुख्यमंत्री – वि. वा. शिरवाडकर

185.00 Original price was: ₹185.00.148.00Current price is: ₹148.00.

Fiction

V. V. Shirwadkar (वि. वा. शिरवाडकर) : Mukhyamantri (मुख्यमंत्री)

हे नाटक १९७७ मधे रंगभूमीवर आले ‘मी एक मुख्यमंत्री’ या नावाने. आणीबाणीच्या पुढेमागे सत्तरीच्या दशकात शिरवाडकरांपुढे काही राजकीय प्रश्न उभे राहिले होते, त्यांना ‘एक होती वाघीण’ (मूळ नाव ‘एक होती राणी’) आणि ‘मुख्यमंत्री’ ह्या नाटकांच्याद्वारे भिडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो.

गांधीविचारांचा पगडा आणि स्वातंत्र्ययुद्धात प्रत्यक्ष भाग घेतलेल्या कार्यकर्त्यांवर स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकारभाराची जबाबदारी घेण्याची पाळी आली. दैनंदिन राजकारणात येणारे नवे अनुभव पेलणे ही गोष्ट सोपी नव्हती. भारतात असे अनेक मुख्यमंत्री स्वतंत्र भारताच्या सुरुवातीच्या दशकांत होऊन गेले. या नाटकातील मुख्यमंत्री त्या गोंधळलेल्या कार्यकत्यांचे प्रतिनिधित्व करतो. बापूजींशी नाते तोडू न शकणारा आणि हातातल्या खापराच्या पणतीतील प्रकाशात सत्याकडे जाऊ पाहणाऱ्याची शोकान्तिका ह्या नाटकात जाणवते.

मुळात १९७९ मधे प्रसिद्ध झालेली नाटकाची ही ‘शिरवाडकर जन्मशताब्दी विशेष’ आवृत्ती. यात नाटकातील प्रमुख पात्रे श्रीराम लागू आणि रोहिणी हटंगडी यांची टिपणे देण्यात आली आहेत.

ISBN : 978-81-7185-647-3

Publisher : Popular Prakashan Pvt. Ltd.

Language: Marathi

Number of page’s : 88

Year of Publication : Reprint 2026

 

Dimensions 21.59 × 13.97 cm