माईंचा स्वयंपाक – मीना देशपांडे

195.00 Original price was: ₹195.00.156.00Current price is: ₹156.00.

Non-Fiction

Category:

Maincha Swayampak (माईंचा स्वयंपाक) – Meena Deshpande (मीना देशपांडे)

भौगोलिक आणि राजकीय परिस्थितीचा परिणाम माणसांच्या राहणीमानावर होतो. मराठवाड्यातल्या पाककृतींचा विचार करताना हे अधिकच जाणवते. कडक उन्हाळा, कमी पाऊस त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती आणि निजामी राजवटीचा जाच या प्रतिकूल परिस्थितीशी सततची झुंज म्हणजे मराठवाडा असं म्हणता येईल. असं असूनही इथं त्याचं श्रेय इथल्या सुगरणींनाच जातं. कमीत कमी रसना वैभव मात्र टिकून आहे. साधनांमधूनही वैविध्यपूर्ण पदार्थ निर्माण करण्याची किमया इथल्या अन्नपूर्णेने केली आहे. माई देशपांडे यांच्या ‘माईंचा स्वयंपाक’ या पुस्तकातल्या पदार्थांवर नजर टाकली तर दिसून येईल की, ज्वारी-बाजरी, तांदूळ, सुकं खोबरं, दाण्याचं कूट आणि काळा मसाला एवढ्या मर्यादित साधनांनीदेखील कितीतरी रुचकर आणि विविध पदार्थ करता येतात. ताज्या भाज्यांबरोबरच वाळवलेल्या भाज्या, भिजवलेल्या कडधान्यांबरोबरच ओल्या दाण्यांचा, शेंगांचा वापर, वेगवेगळ्या चटण्या, सांडगे यांचा वापर हे या स्वयंपाकाचं वैशिष्ट्य. माई देशपांडे यांनी काहीशा दुर्लक्षित असलेल्या ह्या पाककलेला शब्दरूप देऊन हा वारसा जपला आहे. संतभूमी मराठवाड्यातील अनेक स्थित्यंतरं बघत मोठ्या झालेल्या माईंनी तिथल्या अनामिक सुगरणींकडून घेतलेला परंपरागत पाकसिद्धीचा वसा अगदी सोप्या पद्धतीने आजच्या गृहिणीला बहाल केला आहे. हाताशी असणाऱ्या वस्तूंमधून उत्तम रुचीचा एखादा पदार्थ करण्याचं माईंचं कसब विलक्षण होतं. इतरांकडून उत्तम पदार्थांच्या जोडीला जिव्हाळा, आतिथ्य आणि टापटीप या गोष्टीही हव्यात याबाबत त्या आग्रही असत. अफाट वाचन आणि नव्या ओळखीतून माणसं जोडणं हे त्यांचे वेधक पैलू, सत्तरी ओलांडल्यावर नेटाने लिहिलेलं हे पुस्तक बघण्याचा योग मात्र त्यांच्या नशिबी नव्हता. मात्र या पुस्तकाच्या निमित्ताने अन्नपूर्णाचा हा वारसा घेऊन त्या घराघरातून गृहिणींसोबत पुढील अनेक पिढ्यांपर्यंत राहतील. पुस्तकाच्या निमित्ताने माई देशपांडे यांनी अन्नपूर्णचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत नेला आहे.

ISBN: 978-81-7185-990-0

Number of pages: 156

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2009

 

Weight 0.120 kg
Dimensions 7 × 9 cm