मांजरं तीन, पण इच्छा एक / सारा साहिनकनाट / भाषांतर : उषा मेहता

150.00 120.00

Manjara Teen, Pan Ichha Ek / Sara Şahinkanat / Tr. Usha Mehta

सारा साहिनाकनात (१९६६, इस्तंबूल) उस्कुदार अमेरिकन अकॅडमी आणि बोस्फोरस युनिव्हर्सिटीच्या ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशन डिपार्टमेंटमधून पदवीधर झाल्या. अनेक वर्ष त्यांनी अनुवादाचे काम केले. तसेच जाहिरात क्षेत्रात काम केले. सन २००१ मध्ये त्यांच्या तान या मुलाच्या जन्मानंतर त्याला रिझवण्यासाठी त्यांनी चित्रमय पुस्तके लिहिण्यास सुरुवात केली व पुढे मग इतर मुलांसाठीही त्या लिहू लागल्या. सन २००९ मध्ये ओशिमा इंटरनॅशनल हँडमेड चित्रमय कथा स्पर्धेत त्यांचे ‘The Lizard’s Magical Tail’ हे पुस्तक उल्लेखनीय म्हणून वाखाणण्यात आले. त्यांनी लिहिलेल्या व आयसो इनान यांनी इलस्ट्रेशन्स केलेल्या ‘Who’s Afraid of Little Red Riding Hood’ या पुस्तकाची ‘इंटरनॅशनल बोर्ड ऑफ बुक्स फॉर यंग पीपल’ने सर्वोत्तम चित्रमय पुस्तक म्हणून निवड केली होती. त्यानंतर त्यांची चित्रकथांची बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

ही एक भन्नाट गोष्ट आहे तीन जिवलग मित्रांची ! म्हणजेच बन्या, मन्या आणि सोन्या या तीन मांजरांची. यातल्या एका मित्राच्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून बाकीचे दोघे काय काय करतात याची आपण कल्पनाही करू शकणार नाही. विज्ञान आणि कल्पना यांचा विलक्षण मेळ असलेल्या या गोष्टीतून मुलांचे छान मनोरंजन होते. मैत्री भावना जोपासणारी, सुंदर चित्रांनी सजलेली ही साहसकथा टर्कीमधील लेखिका सारा साहिलकनात यांनी खास मुलांसाठी लिहिली आहे. ह्या गोष्टीचा उषा मेहता यांनी तितक्याच मजेदार शैलीत अनुवाद केला आहे, तर आयसे इनान अलिकान यांनी रेखाटलेली चित्रे या गोष्टीची उत्सुकता वाढवितात.
Weight 0.40 kg
Dimensions 27.94 × 20.30 cm
ISBN

978-81-956093-8-3

Pages

32

1st Edition

2022

Binding

Paperback

Text Printing

Four Colour