Mahavriksha (महावृक्ष) – Kusumagraj (कुसुमाग्रज)
शालेय वयात मी लेखनाला सुरुवात केलेली आहे. पुढे मी बहुतेक सर्व वाङ्मयप्रकारांत लेखन केले असले तरी प्रारंभ कवितेनेच झाला आणि आयुष्याच्या संधिकालात कविताच मला साथ करीत आहे. म्हणजे गेली साठ. वर्षे मी हा लेखनाचा प्रपंच केला आहे. या तळावरून मी मागे वळून पाहतो. तेव्हा स्मृतीच्या पटलावर अनेक चित्रे मला दिसतात. व्यक्तिगत जीवनातील सुखदुःखाची चित्रे दिसतात, त्याप्रमाणे राष्ट्रीय जीवनातील संघर्षाचे आणि साफल्याचे शिलालेखही दिसतात. मानवी व्यवहारासंबंधी एक वेगळी दृष्टी. देणारे रिकाम्या खिशाचे खडतर अनुभव मी घेतले आणि त्या अनुभवांनाही सोनेरी किनार देणाऱ्या १९४२ च्या काँग्रेस अधिवेशनासारख्या ऐतिहासिक घटना मी पाहिल्या. देशाच्या मुक्ततेसाठी सामान्यांनी केलेले बलिदान पाहिले आणि त्या रक्ताच्या समुद्रातून प्रकट होणारा स्वातंत्र्याचा सूर्योदयही मी साजरा केला. नंतरच्या चाळीस वर्षांतील आशनिराशांचे उद्रेकही मी अनुभवले. या प्रदीर्घ यात्रेत कवितेने मला सोबत केलीच, पण ती करताना व्यक्तिगत, सामाजिक, राष्ट्रीय घटनांचे सत्त्व शोधण्याचा तिने प्रयत्न केला आणि पर्यायाने माझ्या जगण्याला तिने एक व्यापक आशयही मिळवून दिला. माझी कविता लौकिक दृष्टीने, महालात बसलेली मानिनी नसेल, रस्त्यावर वावरणारी वैरागीण असेल. पण एक मिणमिणता दिवा घेऊन ती माझ्याबरोबर नव्हे, माझ्यापुढे सतत चालली आहे. त्या दिवल माझे मी पण तर मला सापडलेच, पण या मीपणाचा भोवताल राशी असलेला संबंधही सापडला. हे कवितेचे फिटणारे आहे. तरीही मी बनलो नाही वा कवितेसाठीही जगली नाही. पण कवितेने मला जगवले आहे आणि माझ्या जगण्याला माझ्यापुरताच एक विशेष अर्थ मिळवून दिला आहे.”
— कुसुमाग्रज
ज्ञानपीठ प्रदान समारंभातील भाषणातून
ISBN: 978-81-7185-478-3
No. Of Pages: 84
Year Of Publication: 1994