Marathi Rangbhumichya Tees Ratri – Ek Samajik Rajkeey Itihas (Teen Khanda) (मराठी रंगभूीच्या तीस रात्री – एक सामाजिक-राजकीय इतिहास (तीन खंड)) : Makarand Sathe (मकरंद साठे)
आधुनिक मराठी रंगभूमीला गेल्या दीडशे पावणेदोनशे वर्षांचा अत्यंत समृद्ध असा इतिहास आहे. या कालखंडात महाराष्ट्रातील आणि भारतातीलही – सामाजिक राजकीय वास्तवात जेवढे मूलभूत बदल झाले तेवढे त्याआधीच्या काही हजार वर्षात झाले नव्हते. मराठी रंगभूमी या बदलांची साक्षी होती आणि आपल्या परीने त्यांचे अर्थ लावत तिने काही सक्रिय भूमिकाही निभावली. हा अशा रंगभूमीचा विलक्षण इतिहास तर आहेच, पण एका प्रकारे तो या कालखंडातील सामाजिक वास्तवाचाच मांडलेला एक लेखाजोखाही आहे.
समाजातील सर्व थरांतल्या आणि सर्व जातकुळीच्या (genre) रंगभूमीला आणि त्याद्वारे सामाजिक बदलांना भिडण्याचे असे प्रयत्न मराठीतून याआधी फारसे झालेले नाहीत. त्यामुळे हा ग्रंथ रंगभूमी व साहित्य यांत रस असणाऱ्यांसाठी, तसेच एकंदरीनेच सामाजिक शास्त्रे आणि इतिहास या क्षेत्रांतील अभ्यासकांसाठीही महत्त्वाचा संदर्भग्रंथ ठरावा. त्याबरोबरच या ग्रंथातील मांडणी, एका विदूषकाने एका नाटककाराला सांगितलेल्या तीस कथा, अशा स्वरूपात मुद्दाम करण्यात आली आहे. या मांडणीत इतिहास अभ्यासाच्या शिस्तीबाबत कोणतीही तडजोड केलेली नसली तरीही, अशा स्वरूपामुळे हा ग्रंथ, या विषयाचा काही खास अभ्यास नसणाऱ्या सामान्य वाचकासही एखाद्या कादंबरीप्रमाणे ‘सहज’ गुंतवून ठेवेल.
या पहिल्या खंडात, मराठी नाटकाचीच नव्हे, तर महाराष्ट्रातील प्रबोधनाची मुहूर्तमेढ ज्यात रोवली गेली आणि पहिली पायाभूत जडणघडण ज्यात झाली त्या, १८४३ ते १९४७ या वासाहतिक कालखंडाचा आढावा घेण्यात आला आहे.
या दुसऱ्या खंडात, १९४७ ते १९७५ या स्वातंत्र्योत्तर कालखंडातील नव्या उन्मेषाने भरलेल्या पहिल्या तीन दशकांचा आढावा घेण्यात आला आहेया
तिसऱ्या खंडात, १९७५ नंतरच्या उत्तरोत्तर अधिकाधिक व्यामिश्र होत गेलेल्या कालखंडाचा आढावा घेण्यात आला आहे.
ISBN: 978-81-7185-762-3
Number of pages: 1778 (All 3 Khanda total pages)
Language: Marathi
Cover : Hardbound
Year of Publication: Reprint 2025