Bhumiputra (भूमिपुत्र) – Madhav Kondvilkar (माधव कोंडविलकर)
आज कादंबरीच्या आशयाचे केंद्रस्थान ग्रामीण जीवनाभोवती फिरताना दिसते आहे. ह्या बरोबरच दलित, अस्पृश्य समाजाच्या आजही कायम असलेल्या व्यथा, त्यांचे दुःख, दारिद्र्य आणि अंधःकारमय भविष्यकाळ यांचेही चित्रण बऱ्याच वेळा कादंबऱ्यांमधून होत असते. अशाप्रकारचे ग्रामीण जीवनाचे दर्शन आपल्या कादंबऱ्यांमधून ज्यांनी सर्वप्रथम घडवले अशा लेखकांमध्ये माधव कोंडविलकर यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.
‘झपाटलेला’ या नावाने पूर्वी प्रसिद्ध झालेली ही कादंबरी कोंडविलकरांनी पुन्हा नव्याने लिहिली. कोकणातल्या कुणबी समाजाचे अज्ञान, रुढीसमजुतीमधे अडकलेले, त्यातच गुरफटलेले आयुष्य त्यांच्या लक्षात आले. उच्च वर्गात मोडत असल्याने शासकीय फायदे नाहीत आणि दारिद्र्य, अज्ञान, अधश्रद्धांचा परंपरागत पगडा असा दुहेरी शाप भोगणाऱ्या खऱ्या भूमिपुत्राच्या चालीरीती, त्यांचे हेवेदावे, परस्पर संवादांतले खटके यांची चित्रमय वर्णन कोंडविलकरांनी या कादंबरीत केली आहेत.
विविध वृत्तीप्रवृत्तीच्या व्यक्तिरेखा, त्यांच्या आयुष्याचे चढउतार, त्यांची मर्यादित उंचीची सुखदुःखे वर्णन करताना कोंडविलकरांमधला तळमळीचा कार्यकर्ता सतत जागरूक असल्याने ह्या सर्व व्यक्तिरेखा आणि त्यांचे आयुष्य अधिकच जिवंत बनले आहे असे दिसते.
ISBN: 978-81-7185-965-8
Number of pages: 260
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: 2010