Bhavbhuti (भवभूति) – Dr. Vasudev Vishnu Mirashi (डॉ. वासुदेव विष्णू मिराशी)
संस्कृत वाङ्ययाचे चिकित्सक आणि रसिक टीकाकार आणि प्राचीन भारतीय इतिहासाचे विद्वान संशोधक म्हणून डॉ. मिराशी यांची ख्याती आहे. आतापर्यंत त्यांनी संस्कृत व प्राकृत वाङ्यय आणि प्राचीन भारतीय इतिहास या विषयांवर इंग्रजीत सुमारे अडीचशे आणि मराठीत सुमारे सव्वाशे संशोधनपर लेख लिहून अनेक प्रश्नांवर महत्त्वाचा प्रकाश टाकला आहे. भारत सरकारच्या पुरातत्त्व खात्याने आपल्या ‘भारतीय उत्कीर्णलेखसंग्रह’ या सुप्रसिद्ध ग्रंथ- मालेत त्यांचे ‘कलचुरि-चेदि संवताचे कोरीव लेख’ आणि ‘वाकाटकांचे कोरीव लेख’ हे दोन वृहद् ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत. याशिवाय त्यांचे ‘स्टडीज् इन इंडॉलॉजी, भाग १ ते ४’ हे ग्रंथ इंग्रजीत, आणि ‘कालिदास’, ‘संशोधन- मुक्तावलि, सर १ ते ५’, ‘कलचुरि नृपति आणि त्यांचा काल’, ‘वाकाटक नृपति आणि त्यांचा काल’, ‘मेघ- दूतांतील रामगिरि अर्थात् रामटेक’ इत्यादी ग्रंथ मराठीत प्रसिद्ध झाले आहेत.
ISBN: 81-7185-102-9
Number of pages: 410
Language: Marathi
Cover: Paperback with flap
Year of Publication: 1968