बखर एका वेडघरची – आयफर टंक / अनुवाद : अरुणा श्री दुभाषी

775.00 Original price was: ₹775.00.620.00Current price is: ₹620.00.

Fiction

Ayfer Tunç / Tr. : Aruna Shri. Dubhashi (आयफर टंक / अनुवाद : अरुणा श्री दुभाषी) : Bakhar Eka Vedgharachi (बखर एका वेडघरची)

बखर एका वेडघराची’ ही कादंबरी ‘पॅलिम्पसेस्ट’ म्हणजे मूलावशेषी संरचनेत लिहिली गेली आहे. दोन शतकांदरम्यान उभं असलेलं तुर्कीचं साहित्यिक जग जिवंत करत ती स्थानिक आणि ऐहिक लेखनसीमांना आव्हान देते. कादंबरीचा एक अवकाश एकोणिसाव्या शतकात आणि दुसरा एकविसाव्या शतकात असून, कथानक कोकेशियन प्रदेश, ऑटोमन आणि रिपब्लिकन तुर्की, हंगेरी, फ्रान्स, स्वीडन, आणि यूएसएभोवती रुंजी घालतं आणि पुन्हा माघारी फिरतं. टंकची वेगवान, आक्रमक, भोवळ आणणारी लेखनशैली वाचकांना खिळवून ठेवतेच; शिवाय कथानकाचा शेवट नेमका अपेक्षित असताना कथेला अचानक एक नाट्यमय कलाटणी येते आणि वाचकांना नव्याने अचंबित करते.
एकशेतीस वर्षाच्या कालावधीत घडलेल्या, महत्त्वाच्या राजकीय आणि सामाजिक घटनांचं, तीनशेहून अधिक व्यक्तिरेखांचं प्रभावी शब्दचित्रण म्हणजेच ‘बखर एका वेडघराची’ ही कादंबरी. टंकची सुंदर भाषाशैली आणि तेवढीच तटस्थ-निर्विकार कथनशैली ह्यांचा मिलाफ असा काही आहे, की त्या वाचकासमोर वास्तवाचं सर्वात तीव्र रूप उभं करतातः आज आपण आहोत. उद्या कदाचित नसू. मग आपण स्वतःचे आयुष्य सार्थ कसे करणार ?
रुग्णालयाच्या इमारतीची चक्रव्यूहासारखी भासणारी संरचना आणि कादंबरीच्या पात्रांचा एकूण गोतावळा हे तत्कालीन तुर्की शहराला साजेसे रूपक आहे. आयुष्याच्या क्षणभंगुरतेच्या जाणिवेबरोबर शेवटी आपण सगळे ‘मनुष्यजन्म’ या महानाट्यातील कलाकारच आहोत, ह्याची आठवण आयफर टंक आपल्याला या कादंबरीत करून देतात.

ISBN : 978-81-993948-6-5

Publisher : Popular Prakashan Pvt. Ltd

Language: Marathi

Number of page’s : 504

Year of Publication : 2026

Dimensions 21.59 × 13.97 cm