पूर्णविरामानंतर : राही अनिल बर्वे

80.00 Original price was: ₹80.00.64.00Current price is: ₹64.00.

Non-Fiction

Purnaviramanantar (पूर्णविरामानंतर) : Rahi Anil Barve (राही अनिल बर्वे)

मराठी नवकथेला पुढे नेणारे व जी. ए. कुलकर्णी यांच्या प्रतिभेचा वारसा चालवणारे ने लेखक आहेत त्यांच्यापैकी राही अनिल बर्वे हे एक होत. माणसाला जीवनप्रवासात सतत तोंड द्याव्या लागणाऱ्या वास्तव संघर्षांचे चित्रण आपल्या कथांमधून परिणामकारकरीत्या करण्यात राही यशस्वी झाल्याचे दिसते. त्यांच्या काही कांचा शेवट शोकात्म आहे, परंतु तो कथानकात घडत जाणाऱ्या घटनांचा, व्यक्तीच्या क्रियाप्रतिक्रियांचा अपरिहार्य शेवट असतो. मानवी जीवनाचा केवळ जगण्यासाठी सतत चाललेला संघर्ष व त्याचे विविध परिणाम हाच राहींच्या सर्व कथांचा गाभा असून त्यांच्या कथांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे असे म्हणावे लागेल,

‘पूर्णविरामानंतर’ मधील कथांमधून बर्वे यांनी मानवी मनाच्या अनेक वृती-प्रवृत्तींचे दर्शन घडवले आहे. वेगवेगळ्या स्वभावांच्या व्यक्तींचे समाजातील वावरणे आणि त्यांच्या जगण्याविषयीच्या प्रतिक्रिया बर्वे यांनी आपली चित्रदर्शी भाषा व चपखल प्रतिमा यांच्या साहाय्याने अत्यंत प्रभावीपणे साकार केल्या आहेत.

कमी लेखनातून आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवणाऱ्या मोजक्याच लेखकांमध्ये राही अनिल बर्वे यांची गणना करावी लागेल. ‘पूर्णविरामानंतर’ या पहिल्याच संग्रहाने वाचकांच्या त्यांच्याविषयीच्या अपेक्षा उंचावतील यात शंका नाही.

ISBN: 81-7185-683-7

Number of pages: 96

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2001

Weight 0.132 kg
Dimensions 13.97 × 21.59 cm