Pahije Jatiche (पाहिजे जातीचे) – Vijay Tendulkar (विजय तेंडुलकर)
समाजातील गंभीर कूटप्रश्नाच्या संशोधनात आणि सोडवणुकीच्या प्रयत्नात तेंडुलकरांना रस आहे. माणूस म्हणून, नागरिक म्हणून अशा प्रयत्नांच्या प्रक्रियेत ते उघडपणे सामीलही असतात.
अशा ‘लक्ष्य’ प्रश्नांना समोर मांडणे, त्यांची उत्तरे सुचविणे हेच नाही; हे प्रश्न निर्माण करणारी परिस्थिती, त्यात गुंतलेली माणसे आणि त्यांचे प्रश्न, त्यामधून नाट्य शोधणे हे त्यांचे लक्ष्य असते.
या नाटकात जास्त शिक्षणाने बेकार झालेल्या एका ग्रामीण, गरीब, प्राध्यापकाचे चित्रण आलेले आहे. शिक्षणामुळे हातात पेन धरण्याची सवय असलेल्या त्याला प्रसंगी प्रतिकारासाठी दंडुकाही धरता येत नाही.
ISBN: 978-81-7185-882-8
No. of Pages: 120
Year of Publication: 1981