Palaskhedhchi Gani (पळसखेडची गाणी) – Na. Dho. Mahanor (ना. धों. महानोर)
एखादी कविता, एखादं गीत नुसतं पुस्तकात वाचून त्याच्या ताकदीसकट आपल्यावर प्रभाव पाडील. त्याचं सौंदर्य कळेल. लोकगीताचं असं होत नाही. त्याचं खरखुर सौदर्य, शक्ती अजमावून पाहायची असेल तर ते त्या त्या लयीत, ठेक्यात, थोडं संदर्भासकट ऐकलंच गेलं पाहिजे. लोकसाहित्य, मग ते कथा असो, ओवी असो, झोपाळ्याचं गाणं असो, भारूड किंवा फुगडी असो, त्याच्या अंगभूत कलाकुसरीन, अंगभूत सौंदर्यानं गावरान शब्दकळेनं, अनुभवाच्या जिवंतपणानं ऐकणाऱ्यांच्या मनात पक्क घर करून बसतं, त्यांच्या मनावर सारखं भिरंगत रुंजी घालून बसतं, त्यांच्या मनावर सारखं भिरंगत रुंजी घालून बसतं. लोकगीत हे खेड्यापाड्यातल्या अडाणी लोकांचं हृद्गत असतं, लयबद्ध गाणं असतं. शब्दांची, अनुभवांची, भावभावनांची अतिशय धारदार बांधणी त्यात असते. शब्दसामर्थ्याच्या, त्याच्या विविध अपरंपार चालत आलेल्या नव्या बांधणीचा गहिरेपणात, लयबद्ध हिंदोळ्यात आपण बुडून जातो. सबंध मानवी जीवनातलं स्त्री-पुरुषांचं सुखदुःख, यातना, शृंगार, देवदैवतादिकांची वर्णनं रोजच्या साध्यासुध्या पद्धतीनंच गाण्यांतून मांडली गेली आहेत. कुठंही खोटेपणा किंवा अतिरेकी अभिनिवेश नाही. अतिशय श्रेष्ठ दर्जाच्या साहित्याच्या सर्व गुणांचा मिलाफ लोकसाहित्यात आढळून येतो..
ISBN: 978-81-7185-267-3
No. of Pages: 72
Year of publication: 1982