Nakshi-daar (नक्षी-दार) – Oya Baidor (ओया बाय्दोर)
विविध जागतिक भाषांतील उत्तम साहित्य आपल्या भाषेत अनुवादित करून घेतल्यामुळे उत्तम साहित्याचा आस्वाद घेता येतो. तसेच त्या त्या देशांच्या संस्कृतीचा परिचयही होतो. म्हणूनच पॉप्युलरने असे उत्तम साहित्य मराठीत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या उपक्रमात या वर्षी तुर्की भाषेतल्या सात महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांचे अनुवाद प्रकाशित करण्याचे निश्चित झाले. त्यांपैकी ही एक कादंबरी.
तुर्की भाषेतील लोकप्रिय लेखिका ओया बाय्दोर यांच्या ‘इर्गुवान कापिसे’ या कादंबरीचे ‘नक्षी – दार’ या नावाने जयश्री हरि जोशी यांनी केलेल्या अनुवादामधून एका वेगळ्या धार्मिक संस्कृतीचा परिचय होतो.
जुदासवृक्षाच्या फुलांची नक्षी असलेल्या प्रवेशद्वाराचा शोध घेताना अनेक माणसांच्या आयुष्यात एका विशिष्ट राजकीय पार्श्वभूमीवर गूढ नाट्य घडत जाते, ते वाचकाला एक वेगळीच भुरळ घालत राहतं. वेगवेगळ्या नात्यांची वीण शोभादर्शकासारखी वाचकांसमोर फिरवली जाते. थोडेसे गूढ, माणसाला गुंतवून ठेवणारे, उत्कंठा वाढवणारे, या कादंबरीचे कथानक आयुष्याकडे एका नव्या उमेदीने पाहायला शिकवते.
ISBN: 978-81-7185-502-5
No. of Pages: 374
Year of Publication: 2015