Thamb Saheli (थांब सहेली) – Kusumagraj (कुसुमाग्रज)
“जगात जगाचे रहिवासी कोणीच नाहीत.
असले तर फार थोडे. सर्व जण आपल्या देशाचे,
प्रांताचे, जिल्ह्याचे आणि गावाचे रहिवासी आहेत.
सर्व माणसं सरहद्दीत राहत आहेत.”
“सरहद्दी अपरिहार्य नाहीत का?”
“अपरिहार्य असतील; पण आवश्यक नाहीत
आणि इष्टही नाहीत. अवाजवी खाण्यान
अजीर्णाचा आजार होतो. तो अपरिहार्य,
पण आवश्यक वा इष्ट नाही.”
“पण सरहद्दी नष्ट करण्याचं कार्य धर्मानं.
राजकीय, सामाजिक तत्त्वज्ञानांनी केलं आहे.”
“त्यांनी काही सरहद्दी नष्ट केल्या. पण
अधिक मोठ्या अधिक कर्मठ अशा सरहद्दी
निर्माण केल्या. कोणतीही सरहद मग ती
धर्माची असो वा देशाची असो
माणसाची विचारशक्ती मारते.”
ISBN: 978-81-7185-715-9
No. Of Pages: 92
Year Of Publication: 2002