Tee Pandhari Resha / Çiğdem Kaplangi / Tr.: Usha Mehta
सिगमन कापिलांग (२० डिसेंबर १९७३) यांचा जन्म इस्तंबूलमध्ये झाला. पण वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत त्यांचे वास्तव्य पाच वेगवेगळ्या देशांमध्ये झाले. सुदैवाने त्यांना निसर्गसुंदर कोस्तारिका (घाना) येथे शाळेत प्रवेश मिळाला. इस्तंबूलमधील रॉबर्ट कॉलेजमधून पदवीधर झाल्यानंतर त्या पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या. बार्ड कॉलेजमध्ये मानसशास्त्राचा अभ्यास सुरू असतानाच त्यांनी लॅटिन अमेरिकन साहित्याचा अभ्यासही केला. त्यानंतर न्यूयॉर्कमध्ये जाहिरात क्षेत्रात त्यांनी काही काळ काम केले. त्यांनी कॉपीरायटर म्हणून काम केले, तसेच गीतकार म्हणूनही त्या प्रसिद्ध होत्या. टर्कीला परतल्यावर त्यांचे लेख, मुलाखती, वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या. सध्या सिगमन कापिलांग इस्तंबूलमध्ये पती व दोन मुलांसमवेत राहात असून त्या मुलांसाठी लेखन करीत असतात.
सिगमन कापिलांग यांच्या मूळ टर्किश गोष्टीचा कवयित्री उषा मेहता यांनी केलेला हा रसपूर्ण मराठी अनुवाद. मनोरंजनाबरोबरच मुलांना मैत्री, प्रेम, परस्पर बंधुभाव यांची नकळत शिकवण देणारी ही गोष्ट.
रे आणि हूर या दोन गावांत क्षुल्लक कारणावरून निर्माण झालेलं वैर दोन छोटी मुलं कशी युक्तीने नष्ट करतात आणि दोन्ही गावं एकत्र करतात त्याची ही गोष्ट. रे आणि हूर ही गावं एकत्र येऊन हुर्रे नावाने पुन्हा एकदा आनंदाने आणि मजेने नांदतात.
मैत्री, प्रेम यांचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व सांगणारी ही गोष्ट त्यातल्या अतिशय सुंदर चित्रांमुळे आकर्षक झाली आहे.





