Taledanda (तलेदण्ड) – Girish Karnad / Tr. Uma Kulkarni (गिरीश कर्नाड / अनु. उमा कुलकर्णी)
बाराव्या शतकात बसवण्णा आणि त्याच्या अनुयायांनी कर्नाटकातील सामाजिक-सांस्कृतिक जीवनात जी उलथापालथ केली आणि ज्या चळवळीचा शेवट भयंकर नरसंहार आणि रक्तपात ह्यात झाला त्या ऐतिहासिक संदर्भाचा रूपकात्मक वापर करून कार्नाडांनी या नाटकात ‘मंदिर’ आणि ‘मंडल’ चळवळींच्या निमित्ताने उद्भवलेल्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. या नाटकाच्या प्रस्तावनेत कार्नाडांनी म्हटल्याप्रमाणे १९८९ मधल्या भयावह घटना आणि धर्मांधतेच्या पकडीत तडफडणारं आपलं राष्ट्रीय जीवन यांच्याकडे पाहताना जाणवत राहतं की बाराव्या शतकात या द्रष्ट्यांनी मांडलेल्या या संदर्भातल्या उपायांकडे दुर्लक्ष करणं किती धोकादायक आहे.
ISBN: 978-81-7185-913-9
Number of pages: 104
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: 2007