Tabla (तबला) : Arvind Mulgaonkar (अरविंद मुळगावकर)
आजपर्यंत ‘तबला’ या विषयावर इंग्रजी, मराठी व हिंदीतून बरीच पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. परंतु अरविंद मुळगांवकरांनी ‘तबला ‘या पुस्तकात ‘तबलावादन ‘या विषयाचा सर्वांगीण अभ्यास करून विषय शास्त्रीय पद्धतीने मांडण्यासाठी ज्या मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते त्या सर्वांचा अंतर्भाव केला आहे.
आवश्यक त्या सांगीतिक शास्त्रीय माहितीव्यतिरिक्त मुळगांवकरांनी तबल्याची रचना, बांधणी, मापे, तबलावादकांची घराणी, तबल्याचा रियाज कसा करावा, स्वतंत्र वादन व साथसंगत याविषयी मार्गदर्शन, स्वतंत्र तबलावादनाच्या रसग्रहणाचे निकष याविषयीच्या माहितीबरोबरच अनेक गुणी वादकांचा थोडक्यात परिचय करून दिला आहे.
अरविंद मुळगांवकर उस्ताद अमीर हुसेन खाँसाहेबांचे गंडाबंध शागीर्द होते. अनेक बुजुर्गाकडून त्यांनी बंदिशींचा प्रचंड संग्रह आत्मसात केला. तबल्याचा प्रसार करण्याच्या हेतूने ठिकठिकाणी त्यांची शिबिरे व सप्रयोग व्याख्याने होत असतात.
कलाक्षेत्रातील अस्थिर जीवनाचा धोका पत्करण्यास आजची तरुण पिढी तयार नसल्याने, विशेषतः स्वतंत्र तबलावादनाला वाहून घेणारे विद्यार्थी हळूहळू कमी होत चालले आहेत. हीच गोष्ट लक्षात घेऊन मुळगांवकरांनी हे विद्येचे भांडार लिखित स्वरूपात या पुस्तकाद्वारे खुले केले आहे.
ISBN: 978-81-7185-526-1
Number of pages: 514
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: Reprint 2024