Dr. Babasaheb Ambedkar
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः वाचून प्रशंसा केलेले, बाबासाहेबांच्या हयातीत प्रथम प्रकाशित झालेले त्यांचे साधार चरित्र.
एवढी तेवढी प्रतिकूलता कोणाच्याही वाट्याला कधीमधी येते. पण जन्माबरोबरच प्रतिकूलता डोंगरासारखी पुढ्यात हजर असलेल्या माणसाने काय करावे? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात प्रतिकूलतेने जे तांडव घातले ते पचवून बाबासाहेब माणूस म्हणून प्रस्थापित झाले, चैतन्याने लक्षलक्ष उजळून निघाले. ती दीप्ती अशी अभिनव होती की तिने बाबासाहेबांच्या कोटीकोटी बांधवांना जागृत करून ‘मदायत्तं तु पौरुषं’चा मंत्र त्यांच्या प्राणांत भरला आणि त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवले. ती अद्भुत कहाणी प्रत्यक्षात कशी घडली याची रोमांचकारी हकीकत या महाचरित्रात संयमशील समरसतेने सांगितलेली आहे. चरित्रनायकाचे प्रसाद्पूर्ण दर्शन झाल्याचे समाधान चरित्रकार धनंजय कीर यांच्या शब्दांतून मिळते.
ISBN: 978-81-7185-892-7
No. Of Pages: 706 (including 20 Black & White Artplates)
Year Of Publication: 1966