Thakishi Samvad (ठकीशी संवाद) – Satish Aalekar (सतीश आळेकर)
साजरी करतात. ‘इथे’ (here) पासून ‘आता’ (now) विलग होण्याच्या, इथेपणा (hereness) पेक्षा आतापणाला (nowness) मिळणाऱ्या प्राधान्याच्या, त्यामुळे नाटकाची पूर्वअट असणाऱ्या ‘इथे आणि आता’ ही जोडी विभक्त होण्याच्या पाश्र्वभूमीवर ‘ठकीशी संवाद’ ही नाट्य-संहिता एक राजकीय हस्तक्षेप म्हणून वाचावी/ऐकावी/पाहावी लागणार. हा हस्तक्षेप नाटयेच्छा, म्हणजेच मर्त्य माणसांनी समोरासमोर प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आणि ह्या भेटण्यातून अमर्त्य नाट्य-विचाराचा संसर्ग होण्याची इच्छा पुन्हा जागवू इच्छितो. जे आपल्या समोर मंचावर चाललंय ते प्रत्यक्ष घडतंय का जिथं प्रेक्षकांचं असणं अनिवार्य नाही अशा एखाद्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ह्याचं थेट प्रक्षेपण होतंय ह्याविषयी संशय निर्माण करून संहितेतच आळेकर खेळकरपणे नाट्यप्रयोगाच्या होणाऱ्या आभासीकरणाबद्दल आपल्याला जागृत करतात. तरीही ठकीच्या पात्राद्वारे ते प्रत्यक्ष आणि आभास यातल्या ताणाला नवं रूप देतात.
– वैभव आबनावे
ISBN: 978-81-961711-6-2
No. Of Pages: 72
Year Of Publication: 2023