Vasant Abaji Dahake (वसंत आबाजी डहाके) : Chitraalok (चित्रालोक)
चित्रकृतीकडे पाहणे म्हणजे काय? चित्रकृतीचा प्रेक्षक चित्रकृतीत काय पाहतो, कसे पाहतो ?
एक चित्रकृती आपल्या समोर असते. ही चित्रकृती चित्रकाराने कधी केली, त्यावेळी तो कोणत्या मनःस्थितीत होता किंवा त्याची वैयक्तिक स्थिती कशी होती याची आपल्याला नेमकी माहिती नसते. त्याच्या उपलब्ध चरित्रावरून ती आपण मिळवू शकतो. त्याचा काळ, त्या काळातल्या चित्रकलेतल्या चळवळी, त्या काळातली आर्थिक, राजकीय, सामाजिक स्थिती यांविषयीची देखील माहिती आपण मिळवू शकतो. या सर्व माहितीचा आणि चित्रकृतीचा काही अनुबंध आहे का हे आपण शोधतो. चित्रकृतीसमोर आपण उभे असतो तेव्हा काय घडते? चित्रात आपण काय पाहतो? जे पाहतो ते चित्रकाराच्या मनातले आहे असे आपण समजतो का? ती चित्रकृती फक्त समोर असते आणि आपण ती पाहत असतो. आपल्या पाहण्यातून ते चित्र वाचण्याची, उलगडण्याची कृती करत असतो. त्या चित्रात ज्या खुणा असतात त्यांचा आपण माग घेतो. चित्रकृती पाहणे हे चित्रकृतीचे वाचन असते. आपण पाहतो, शांत होतो, अस्वस्थ होतो, विचारमग्न होतो, रंग आणि रेषा यांचे सौंदर्य अनुभवतो.
या विचारातून लिहिलेले काही लेख या पुस्तकात आहेत. दि. के. बेडेकर, सुधीर पटवर्धन, प्रभाकर बरवे, जगदीश स्वामीनाथन, बाळ ठाकूर, मंगेश नारायणराव काळे या भारतीय चित्रकारांबरोबरच व्हिन्सेंट व्हॅन गॉग, मॅग्रिट, रूसो, ब्रॉयघेल, दाली, एशर, शिरिको, जॅक लुई डेव्हिड या विदेशी चित्रकारांच्या चित्रांविषयीचे लहानमोठे लेख येथे आहेत. काही भारतीय आणि काही पाश्चात्य चित्रकृतींकडे कसे पाहिले गेले आहे याचा एक आलेख या लेखसंग्रहात आहे.
ISBN : 978-81-985199-6-2
Publisher : Popular Prakashan Pvt. Ltd
Language: Marathi
Number of page’s : 264
Year of Publication : 2026





