गौतमची गोष्ट / अनिल दामले

175.00 122.50

गौतमची गोष्ट / अनिल दामले (Gautamchi Ghost / Anil Damale)

अनेक प्रारंभ असणारी पण त्यामुळेच कोणताही एक निश्चित प्रारंभ नसणारी, तसेच अनेक शेवट असणारी पण त्यामुळेच कोणताही एक निश्चित शेवट नसणारी अनिल दामले यांची ही कादंबरी, वास्तव आणिल्पनिकता यांच्या विविध पातळ्या एकाच वेळी छेदत आजच्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातील प्रश्नांचा मूलभूत शोध घेणारा एकाच वेळी सामान्य आणि असामान्य असा एक नायक आपल्यापुढे उभा करते. कल्पनेतून निर्माण झालेला नायक अनपेक्षितपणे वास्तवाची पकड घेतो आणि एका जबरदस्त आत्मभानाने अस्तित्वाच्या प्रश्नांचा शोध घेतो, हे या कादंबरीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. व्यक्ती आणि समाजजीवन या संदर्भातील विविध घटना व प्रसंग यांच्या अवकाशात घेतला जाणारा हा एकाकी शोध स्वातंत्र्य, इच्छाशक्ती आणि निवड यांच्यातील गुंतागुंतीचे परस्परसंबंध अधोरेखित करत जातो. प्रथमपुरुषी आणि तृतीयपुरुषी निवेदनतंत्रातील सीमारेषा जाणीवपूर्वक धूसर करणारे निवेदनतंत्र दामले यांनी वापरले असल्यामुळे या आशयसूत्रांची परिणामकारकता वाढते आणि ‘गौतमची गोष्ट‘ ही कादंबरी समकालीन मराठी कादंबऱ्यांमध्ये लक्षणीय ठरते.

Weight 0.330 kg
Dimensions 21.59 × 13.97 × 1.8 cm
ISBN

978-81-7185-335-9

Pages

288

Binding

Paperback

Published Year

1st Edition 1998