गुप्त वरदान / तारा वनारसे

175.00 122.50

गुप्त वरदान / तारा वनारसे (Gupta Varadaan / Tara Vanarase)

तारा वनारसे हे नाव पुढे आले ते लघुकथाकार म्हणून. मराठी नवकथेच्या ऐन मोसमी काळात संख्येने कमी पण गुणवत्तेने लक्ष वेधून घेणाऱ्या त्यांच्या कथांचे ‘पश्चिमकडा’ आणि ‘केवल कांचन’ हे दोन संग्रह अनुभवांची विविधता नेमक्या शब्दांत बद्ध करण्याच्या किमयेमुळे महत्त्वाचे ठरले.
ह्या नवकथेचे स्वरूप काय याचा विचार चालू असताना त्यांनी केलेले पाश्चात्य साहित्याचे वाचन यांतून ‘गुप्त वरदान’ ह्या पुस्तकाचा उगम झाला. त्यांना पुन्हा पुन्हा वाचाव्याश्या वाटणाऱ्या काही मूळ इंग्रजी आणि काही इंग्रजीत अनुवादित झालेल्या कथांमधून त्यांना जाणवलेले सौंदर्य मराठी वाचकांपर्यंत पोचवले पाहिजे या ध्यासातून ही भाषांतरे झाली आहेत. इतकेच नव्हे तर एलिझाबेथ बॉवेन यांनी नवकथेच्या प्रेरणा आणि तिचे स्वरूप याविषयी केलेले निवेदन आणि एम. ई. बेट्स यांच्या लघुकथेविषयीच्या विवेचनातील काही अंश यांचाही त्यांनी परामर्श घेतला आहे. विशेषतः पाश्चात्य नवकथेच्या आणि सिनेमाच्या प्रेरणा तंत्रांमधले साम्य इंगमार बर्गमान, सत्यजित रे यांच्या चित्रपटांतून जाणवले, ते अधिक स्पष्ट करण्यासाठी त्यांनी ॲम्ब्रोझ बीअर्सची एक कथा आणि त्यांच्या चित्रपटावरून लिहिलेली गेलेली कथा असा एक वेगळाच प्रयोग केला आहे.
एका कथाकाराने नवकथेच्या स्वरूपाचा घेतलेला हा अत्यंत वेगळा असा वेध तारा वनारसे यांच्या इतर लेखनाप्रमाणेच वैशिष्ट्यपूर्ण ठरणारा आहे.
Weight 0.225 kg
Dimensions 21.59 × 13.97 × 1 cm
ISBN

978-81-7185-785-2

Pages

164

Published Year

1st Edition 2011

Binding

Paperback