Kilkilya Ujedachi Tirip (किलकिल्या उजेडाची तिरीप) – Anil Dhaku Kambali (अनिल धाकू कांबळी)
अनिल धाकू कांबळी यांच्या या संग्रहातील कवितेत संवेदनशील वाचकांच्या मनाला स्पर्श करून त्याला अस्वस्थ करून सोडण्याचे बळ आहे.
या कवितांमधून येणारे जीवनाचे संदर्भ ग्रामीण-कोकणातले आहे. परंतु ही कविता ‘ग्रामीण’या विशेषणाने बंदिस्त होणारी नाही हा या कवितेचा मोठाच विशेष आहे. केवळ गावातल्या अ-नागर जीवनाचे चित्रण करावे, त्यांचे प्रश्न मांडावेत हा या कवितेचा उद्देशच नाही. साहजिकच अ-नागर जीवनाविषयीचा साचेबंद प्रतिक्रियांना या कवितेत स्थान नाही. गावातल्या जीवनाचे बाह्य तपशील मांडणे हा या कवितेचा हेतूच नाही. ही कविता त्याच्या पुढे जाणारी कविता आहे. बाहेरून नागर जीवनाहून वेगळे वाटणारे हे जगणे आज आतून कसे बदलते आहे याविषयीची संवेदनशील मनाची उत्कट प्रतिक्रिया या संग्रहातील कवितांमधून व्यक्त होत आहे. ही प्रतिक्रिया वर्णन करण्यासारखी नव्हे तर कविता वाचून अनुभवावी अशी आहे.
हा संग्रह वाचताना सतत जाणीव होते ती आजच्या माणसाच्या जगण्यातील अगतिकतेची; काळाच्या ओघात सतत होणाऱ्या बदलांतून काहीतरी हरवत चालल्याची, हे सर्व आपल्या, म्हणजे मानवी सामर्थ्याच्या पलीकडचे आहे याची. परंतु असे असूनही ही कविता निराशाग्रस्त किंवा मानवी जीवनाविषयी तुच्छतावादी होत नाही.
ISBN: 978-81-7185-795-1
Number of pages: 96
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: 2011