काय डेंजर वारा सुटलाय ! : जयंत पवार

175.00 Original price was: ₹175.00.140.00Current price is: ₹140.00.

Fiction

Category:

Kay Danger Vara Sutalay! (काय डेंजर वारा सुटलाय !) – Jayant Pawar (जयंत पवार)

नाकाचा विमा काढता येतो, पण श्वासाचा विमा नाही काढता येत. दाताचा विमा काढता येतो पण ठणक्याचा नाही काढता येत. मरणाचा विमा काढता येतो पण मणक्यात गोठणाऱ्या थंडीचा नाही काढता येत…
सत्यविजय नरहरी दाभाडेंना येणारं हे आत्मभान कोणतंही उपद्रवमूल्य नसणाऱ्या माणसांना नासाडीच्या झंझावातात उद्ध्वस्त होत जाताना कधीतरी येतंच. म्हणूनच ही गोष्ट केवळ दाभाडेंची राहत नाही, तर त्यांच्यासारख्या असंख्यांची होते.
ही गोष्ट जितकी दाभाडेंची तितकीच त्यांच्या मुलांची, बायकोची, त्यांचं घर बळकावण्याच्या कामगिरीवर आलेल्या घुसखोरांची, त्यातल्या मुन्नाच्या अगतिकतेची आणि दुष्काळी भागातून शहरात आलेल्या बबन येलमामेचीही आहे.
विस्थापन आणि स्थलांतर वा जागतिकीकरणोत्तर जगाच्या अविभाज्य ठरत असलेल्या गोष्टींच्या गाभ्याशी हे नाटक आपल्याला नेऊन ठेवतं आणि ‘घुसखोरींचाच इतिहास आहे माणसाचा’ या प्रखर सत्याने भाजून काढतं.
समकालाचं लख्ख भान ठेवत स्थातील व्यामिश्रत घेण्यासाठी रूपबंधाचे प्रयोग करत एका निर्दयी व्यवस्थेचं विक्राळ रूप समोर ठेवणारं हे नाटक जयंत पवार यांच्या लेखकीय वाटचालीतलं ‘अधांतर’ नंतरचं तितकंच महत्त्वाचं नाटक आहे.

ISBN: 978-81-7185-808-8

Number of pages: 84

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2022