इस्तंबूलची स्मृतिचिन्हे – अहमेत उमित

850.00 Original price was: ₹850.00.680.00Current price is: ₹680.00.

Fiction

28 in stock

Istanbulchi Smrutichinhe (इस्तंबूलची स्मृतिचिन्हे) – Ahmet Umit (अहमेत उमित)

बायझँटियमच्या सुरुवातीच्या काळातली राजा बायझास यांची दंतनगरी ते भरभराटीच्या शिखरावरचे आधुनिक महानगर ही इस्तंबूलची ओळख. अनेक शतकांचा इतिहास असलेल्या या महानगराच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर घडणारी एक रोमांचकारी रहस्यकथा…
एक दिवस जुन्या इस्तंबूलमधील आतातुर्क यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी एक प्रेत सापडते आणि या रहस्यमय कहाणीची सुरुवात होते. विशिष्ट प्रकारे मांडून ठेवलेल्या या प्रेताच्या एका हातात एक प्राचीन नाणे असते. या प्रेताचे रहस्य उकलण्यापूर्वीच इस्तंबूलच्या प्रत्येक ऐतिहासिक वास्तूच्या परिसरात काही काही दिवसांच्या अंतराने एकेक मृतदेह सापडू लागतो.
सात टेकड्यांच्या परिसरात झालेले एकूण सात खून, सात प्राचीन नाणी आणि सात प्राचीन वास्तू… आणि या सर्वांना जोडणारा एक सामायिक धागा… काय आहे हा धागा?
प्रमुख इन्स्पेक्टर नेवजात आणि त्याचे सहकारी झैनब आणि अली या रहस्याचा शोध कसा लावतात हे वाचणं जितकं उत्कंठावर्धक आहे तितकीच लेखक अहमेत उमित यांनी केलेली इस्तंबूल शहराची, तिथल्या ऐतिहासिक वास्तूंची वर्णनं वाचणंही मनोरंजक आहे.
अखेरपर्यंत वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या या कादंबरीचा ओघवता अनुवाद सविता दामले यांनी केला आहे.

ISBN: 978-81-958324-4-6

Number of pages: 724

Year of Publication: 2023