इथे ओशाळला मृत्यू : वसंत कानेटकर

185.00 Original price was: ₹185.00.148.00Current price is: ₹148.00.

Fiction

Category:

Ithe Oshalala Mrutyu (इथे ओशाळला मृत्यू) – Vasant Kanetkar (वसंत कानेटकर)

“… संभाजीराजांचा असा शेवट झाला. त्यांच्या आत्मबलिदानामुळे त्या अद्भुत आणि रोमांचकारी आयुष्याचा कळस झाला. संभाजीराजांचे सर्वांत मोठे गुण म्हणजे साहस आणि निर्धार हे होत. .. मोगलांशी निकराच्या झुंजी देऊन त्यांनी त्यांची आक्रमणे परतून लाविली; स्वराज्यातील कारस्थाने त्यांनी हाणून पाडली; फितुरी लोकांना त्यांनी कडक शिक्षा केल्या; त्यांनी बंडे मोडून काढली; पोर्तुगीजांना तंबी दिली; विजापूर आणि गोवळकोंडा या राज्यांना यथाशक्ती मदत केली; आणि हे सगळे त्यांनी नऊ वर्षांच्या अल्पावधीत करून दाखविले… शेवटी ते मोगलांच्या कैदेत सापडले. त्या वेळीही त्यांचे वर्तन अतिशय बाणेदारपणाचे होते. त्यांनी औरंगजेबासमोर मान वाकविली नाही. त्यांनी दयेची याचना केली नाही. त्यांनी निर्भयपणे मृत्यूला कवटाळले…. आपले प्राण पणाला लावून त्यांनी नऊ वर्षेपर्यंत स्वराज्य सुरक्षित ठेवले आणि औरंगजेबाची आक्रमणे हाणून पाडली, हे संभाजीचे खरे व्यक्तिमत्त्व आहे. आणि यामुळेच मराठ्यांचा हा लाडका राजा, शिवपुत्र संभाजी मराठ्यांच्या इतिहासात अमर झाला आहे…”

– सेतुमाधवराव पगडी हिंदवी स्वराज्य आणि मोगल

या नाटकात छत्रपती संभाजीमहाराजांचे हेच चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.

ISBN: 978-81-7185-438-7

Number of pages: 124

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2023