Athavan
गंगाधर गाडगीळ समग्र कथा मालिका : खंड १४
आठवण
महायुद्धोत्तर कालखंडातील नव्या वाङ्मयीन युगधर्माचे प्रतिनिधित्व करणारे गंगाधर गाडगीळ हे मराठीतील एक अग्रगण्य कथाकार होत. कथा या साहित्यप्रकाराची संकल्पना ‘नव’ विणे, ती अधिक खुली करणे हे श्रेय निःसंदिग्धपणे त्यांचे आहे.
गाडगीळांनी आपल्या कथालेखनातून एक नवी कथादृष्टी व्यक्त केली. कथेच्या विविध घटकांच्या स्वरूपात व योजनेत त्यांनी मूलगामी परिवर्तन घडवून आणले, त्यामागचे गमक त्यांच्या कथेतील अनुभवरूपांचे, कथार्थाचे अपारंपरिक / नवीन स्वरूप हे आहे. त्यांच्या नवकथेने मराठी साहित्यक्षेत्रात ज्या नव्या वाङ्मयीन जाणिवा रुजवल्या, त्यांतून मराठी कथा अधिक मूल्ययुक्त तसेच विविध अंगांनी समृद्ध होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या. त्यांच्या कथासाहित्यातून प्रकटलेल्या कलादृष्टीचा संस्कार केवळ कथाक्षेत्रापुरता मर्यादित न राहता एकूण मराठी ललित साहित्यावरही तो घडला, असे म्हणणे यथार्थ ठरेल.
गाडगीळांच्या कथेचे महत्त्व केवळ ऐतिहासिक स्वरूपाचे आहे, असे नाही. तिच्यातील कलापूर्णता तसेच मौलिकता स्वतंत्रपणेही लक्षणीय आहे. गाडगीळांच्या कथेचा प्रवास हा कलावंत म्हणून त्यांचा स्वत्वशोध आहे, गंभीरपणे घेतलेला एक मूल्यशोध आहे.
— सुधा जोशी
‘श्रावण’ (१९७७) आणि ‘आठवण’ (१९७८) मिळून ‘आठवण’ हा संग्रह करण्यात आला आहे. एखाद्या अनुभवाला, भाववृत्तीला अनेक अंगं असतात आणि ती एकमेकांहून भिन्नच नव्हेत, तर कित्येकदा परस्परविरुद्धही असू शकतात; या गोष्टीचं भान राखून विविध अंगांनी घेतलेला अनुभवाचा वेध गाडगीळांच्या कथेत आढळतो. असं बाह्यांगी दर्शन हे या कथेचं एक वेगळेपण ठरते, याचा प्रत्यय या संग्रहातील कथांमधून येतो.
ISBN: 978-81-7185-485-1
No. of pages: 290
Year of publication: 1977