Ashi Pakhare Yeti (अशी पाखरे येती) – Vijay Tendulkar (विजय तेंडुलकर)
अतिशय गंभीर विषय गंभीरपणे हाताळणाऱ्या विजय तेंडुलकरांनी काही हलकीफुलकी, पण मनाला भिडणारी नाटके लिहिली. त्यांपैकीच ‘अशी पाखरे येती’ हे एक नाटक. अरुण ह्या सडाफटिंग तरुणाची ही थोडीशी मजेशीर, तरीही हृद्य कहाणी. अरुण या व्यक्तिरेखेचा प्रेक्षकांशी होणारा संवाद आणि आत्मसंवाद अशी द्वंद्वात्मकता यात आहे. त्यामुळे प्रेक्षक हा या नाटकात एक पात्र म्हणून सहभागी होतो. नाट्यपूर्ण कलाटणी हे तेंडुलकरांच्या नाटकाचे वैशिष्ट्य याही नाटकाच्या अनपेक्षित शेवटातून दिसून येते.
ISBN: 978-81-7185-836-1
Number of pages: 92
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: 4th Ed. 2005 / 4th Reprint 2024