Albatya Galbatya (अलबत्या गलबत्या) : Ratnakar Matkari (रत्नाकर मतकरी)
हॅन्स अँडरसन या जगद्विख्यात परीकथालेखकाच्या ‘द टिंडर बॉक्स’ या परिकथेवर आधारित ‘राजकन्या आणि जादूची आगपेटी’ हे नाटक रत्नाकर मतकरी यांनी लिहिले होते. सालस व्यक्तीला अनेक संकटांना तोंड द्यावे लागून शेवटी यश लाभणे आणि दुर्जनांचा पराभव होणे हे मूळ कथासूत्र असलेल्या या परिकथेचे नाट्यरूपांतर करताना मतकरींना अनेक बदल करणं आवश्यक वाटलं. मूळ कथेत नसलेले अनेक प्रसंग नंतर या नाटकात आले आणि ‘अकबत्या गलबत्या’ या नवीनच नाटकाचा जन्म झाला.
मतकरींच्या मुलांसाठी लिहिलेल्या नाटकांची सगळी वैशिष्ट्य या नाटकातही आपल्याला आढळतात. ‘अलबत्या गलबत्या’ नाटकातल्या घटना आणि व्यक्तिरेखा मुलांना स्पष्टपणे कालव्यात अशा लिहिल्या आहेत. नाटकातल्या पात्रांच्या हालचालींमधली सुस्पष्टता आणि या हालचालींचं महत्त्व हे मतकरींच्या नाटकाचं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच निवेदनं टाळून त्यांनी प्रसंग दाखवण्यावर भर दिलेला दिसतो तसाच संवादापेक्षाही पात्रांच्या हालचालींवर अधिक भर दिलेला दिसतो. अलबत्या, राजा, राणी चेटकी यांच्यातले धमाल प्रसंग मुलांनाच काय पण प्रौढ प्रेक्षकांनाही आपल्याकडे आकर्षून घेतात. त्यामुळेच सुमारे चाळीस वर्षांपूर्वी लिहिलेले हे नाटक असूनही अलीकडेच पुन्हा रंगभूमीवर येऊ शकले आणि शेकडो ‘हाऊस फुल’ प्रयोग करत त्याने एक विक्रमच केला. मुलांनी नाटकाला दिलेली उस्फूर्त दाद ही मतकरींच्या लेखनाला मिळालेली उत्कृष्टतेची पावतीच आहे.
ISBN: 978-81-7185-164-5
Number of pages: 72
Language: Marathi
Year of Publication: Reprint 2018