अजिंठा – ना. धों. महानोर

175.00 Original price was: ₹175.00.140.00Current price is: ₹140.00.

Fiction

Category:

Ajintha (अजिंठा) : N. D. Mahanor (ना. धों. महानोर)

शेताभातात रानाउन्हात रमलेली महानोरांची कविता. ‘ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे/आणि माझ्या पापणीला पूर यावे’ इतके निसर्गाशी तादात्म्य पावलेले हे मन.
‘अजिंठा’ हे महानारांच्या कवितेचे वेगळे वळण. ही एक सलग दीर्घ कविता आहे. कथात्म बाजाची. अजिंठयातील शिल्पांच्या साक्षीने घडलेल्या मेजर गिल आणि पारूच्या प्रेमकथेचा हा काव्यात्म आविष्कार. पारूच्या रूपाने अजिंठयातील शिल्पे मेजर गिलसमोर सजीव झाली. पारू त्याच्या चित्रांची प्रेरणा ठरली, पण पारूभोवतालच्या आडवळणी समाजाला त्यांच्या प्रेमकथेची भाषा समजू शकली नाही. आणि गिलचे आयुष्य औदासिन्याने झाकोळून गेले.
या कथेच्या निमित्ताने महानोरांच्या प्रतिभेला नवा बहर आला आहे. ‘मी माझ्या मुलखात नोंदतो ऐश्वर्याचा राजा /इथल्या मातीमधे रुजविल्या चैतन्याच्या बागा’ हा आत्मविश्वास सार्थ ठरविणारा हा बहर आहे.

ISBN: 978-81-7185-307-6

Number of pages: 96

Language: Marathi

Year of Publication: Reprint 2011

Dimensions 13.97 × 13.97 cm