Haiku… Haiku… Haiku (हायकू… हायकू… हायकू) – Shirish Pai (शिरीष पै)
‘हायकू’ हा मूळ जपानी काव्यप्रकार. जपानी हायकूचा तिथल्या निसर्गाशी जसा संबंध आहे तसाच तो बौद्ध धर्मातील झेन तत्त्वज्ञानाशीही आहे. मात्र असे असूनही या विलक्षण काव्यप्रकारात भाषिक आणि भौगोलिक मर्यादा ओलांडून जाण्याची क्षमता आहे. रवींद्रनाथ टागोरांनी हा काव्यप्रकार बंगाली भाषेत रुजवला तसाच तो हिंदी, पंजाबी याही भाषांमध्ये रुजला. हायकू मराठी भाषेत रुजवण्याचे श्रेय कवयित्री शिरीष पै यांचेकडे जाते. तीन ओळीचे बंधन पाळूनही निसर्ग, प्रेम आणि अध्यात्म यांच्याशी जोडून घेत लिहिल्या गेलेल्या मराठी हायकूला स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य दाखवता आले.
पत्रकारिता, भावकविता, अभंग, ललित लेखन अशा अनेक क्षेत्रांत शिरीष पै यांनी आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले असले तरी त्या मराठी हायकूकार म्हणून मराठी रसिकांच्या चिरकाल स्मरणात राहतील. त्यांनी सुमारे चाळीस वर्षे हायकूच्या बदलत्या रूपाची आराधना केली, हायकूसंबंधी महत्त्वाचे लेखन केले आणि अनेक नवोदित हायकूकारांना मार्गदर्शनही केले. ‘हायकू हायकू हायकू’ या संग्रहात त्यांचे सर्व उपलब्ध हायकू तीन भागांत दिले आहेत.
ISBN: 978-81-7991-973-6
No. of Pages: 400
Years of Publications: 2018