हमीदाबाईची कोठी / अनिल बर्वे (Hamidabaichi Kothi / Anil Barve)
“माझा घर तू बरबाद केला शब्बो… माझ्या घराचा रंडीखाना केला तू… ये कोठी जळून गेली असती, बरसातमधी पडून गेली असती तो भी चांगला झाला असता… तिचा असा रंडीखाना झाला नसता…”
पण कुणालाच हमिदाबाईच्या कोठीचा असा रंडीखाना व्हायला नको होता —
हमिदाबाई तिची कोठी ‘पाक’ ठेवायला मरेपर्यंत धडपडली — तिच्यानंतर सईदा, सत्तार, बाहरवाला आणि शब्बोसुद्धा कोठीचा बाजार होऊ नये म्हणून प्राणपणाने झगडले. मग शेवटी कोठीचं काय झालं?
एका बदनाम मोहल्ल्यातल्या चांगल्या आणि वाईट प्रवृत्तींचा हा जबरदस्त संघर्ष अनिल बर्वे यांच्या नाट्यमय लेखणीने तितक्याच सामर्थ्याने पेलून एक समर्थ संघर्षमय नाटक आपल्यापुढे सादर केले आहे — प्रयोगात जितके ठाशीव तितकेच वाचनात मनाला हादरवून टाकणारे, सुन्न करणारे !





