स्कायस्क्रेपर्स – तहसीन युचेल

450.00 317.00

कादंबरी

Skyscrapers

विविध जागतिक भाषांतील उत्तम साहित्य आपल्या भाषेत अनुवादित करून घेतल्यामुळे उत्तम साहित्याचा आस्वाद घेता येतो. तसेच त्या त्या देशांच्या संस्कृतीचा परिचयही होतो. म्हणूनच पॉप्युलरने असे उत्तम साहित्य मराठीत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या उपक्रमात या वर्षी तुर्की भाषेतल्या सात महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांचे अनुवाद प्रकाशित करण्याचे निश्चित झाले. त्यांपैकी ही एक कादंबरी.

तुर्की भाषेतील लोकप्रिय लेखक तहसीन युचेल यांच्या ‘स्कायस्क्रेपर्स’ या कादंबरीचा ‘स्कायस्क्रेपर्स’ या नावाने शर्मिला फडके यांनी अनुवाद केला आहे. तहसीन युचेल ह्या सुप्रसिद्ध तुर्की कादंबरीकाराने २०७३ सालातल्या तुर्कस्तानचे चित्रण अत्यंत ताकदीने या कादंबरीत आपल्यासमोर उभे केले. उत्तुंग इमारतींच्या जाळ्यापुढे पर्यावरण, निसर्गाला क:पदार्थ लेखण्याचे या कादंबरीतील विचार भयावह आहेत. आपल्या आजच्या वर्तमानात त्याची रुजलेली बियाणे पुढे कोणते स्वरूप धारण करणार आहेत हे समोर स्पष्ट दिसत राहते.

गगनचुंबी इमारतीत राहणाऱ्या, अवकाश वाहनातून फिरणाऱ्या कान तेझकानसारख्या अनेकांना बहिष्कृतांच्या जगण्याची, त्यांच्या अस्तित्वाचीही जाणीव नसावी हे या कादंबरीतील चित्रही दारुण आहे. मात्र कादंबरीच्या नायकाच्या स्वप्नांचा पाठपुरावा ज्या मार्गाने होतो, किंवा होत नाही, ते तहसीन युचेल ज्या पद्धतीने मांडतात ते एकाचवेळी सकारात्मक आशा जागवणारे आणि भयाने थरारून टाकणारेही ठरते. जागतिकीकरण, खाजगीकरण, युरोपियन राजकारण, तुर्की समाजव्यवस्था अशा अनेक गोष्टींना स्पर्श करत, त्यांचा धांडोळा घेत तहसीन युचेल ‘स्कायस्क्रेपर्स’ कादंबरीची रचना टप्प्याटप्प्याने उत्तुंग उभारत जातात.

येणारा काळ जगाला नेमक्या कोणत्या मार्गाने आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने घेऊन जाईल ते आपल्यासारख्या सामान्यांना नाहीच ठरवता येणार किंवा कळणार याची युचेल यांनी उभी केलेली जाणीव अस्वस्थ करून टाकणारी आहे.

ISBN: 978-81-7185-396-0

No. of pages: 292

Year of Publication: 2015