सुंबरान – सारंगी अंबेकर

240.00 192.00

ललितलेखन

Sumbaran

“ग्रंथ हेच आपले गुरू’ ह्या बोधवाक्याचा प्रत्यय कोंडलेल्या दिवसांत विशेषत्वाने आला. या काळात सोबत होती पुस्तकांचीच. ग्रेस ते गाडगीळ, आशा बगे ते विभावरी शिरूरकर, दुर्गा भागवत, विंदा करंदीकर, नारायण सुर्वे आणि कितीतरी! या सर्वांची आणि वेगळेच अनुभवविश्व उलगडणाऱ्या आप्पा कोरपे यांच्यासारख्यांची समाज माध्यमातून जवळीक निर्माण करणारी होती सारंगी आंबेकर.

कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र-आत्मचरित्र, ललितबंध, समीक्षा ह्या सर्व साहित्यप्रकारांतील पुस्तकांचा परिचय ‘सुंबरान’ या छोटेखानी पुस्तकात आहे, त्याचबरोबर पत्रांतून निर्माण झालेल्या साहित्यकृतींचे वेगळेपण ‘सुंबरान’ने प्रथमच लक्षात आणून दिले आहे. साहित्यप्रकाराच्या मागणीनुसार लेखाचे रूप परिचयापासून आस्वादक समीक्षेपर्यंत बदलत असले तरी प्रस्तावनेत प्रा. सुधीर रसाळ लिहितात त्यानुसार, ‘सर्व लेख जरी भिन्न भिन्न स्वरूपाचे असले तरी या सर्व लेखनाचा अंतिम उद्देश साहित्यकृतींबद्दल कुतूहल जागे करणे आणि वाचकाला या साहित्यकृतींचा आस्वाद घेण्यास उद्युक्त करणे हा आहे…..

वाचकाने काय वाचावे आणि तेच का वाचावे यासंबंधी मार्गदर्शन करणारे मराठीतील कदाचित हे पहिलेच पुस्तक असावे. वाचनसंस्कृती समृद्ध होण्यासाठी वाचकांना अशा प्रकारे उत्तमोत्तम साहित्यकृतींचा परिचय करून देऊन त्यांना अशा साहित्यकृती वाचायला प्रवृत्त करणारे लेखन विपुल प्रमाणात होणे आवश्यक आहे.’

ISBN: 978-81-955127-3-7

No. of pages: 148

Year of Publication: 2021