सरदार फाकडोजी वाकडे : रत्नाकर मतकरी

65.00

Fiction

Category:

Sardar Phakadoji Wakade (सरदार फाकडोजी वाकडे) – Ratnakar Matkari (रत्नाकर मतकरी)

मुलांसाठी मराठीत उत्तमोत्तम लेखन करून त्यांचं सांस्कृतिक विश्व समृद्ध करण्याचं काम ज्या अगदी मोजक्या लेखकांनी केलं त्यांपैकी रत्नाकर मतकरी हे एक.

पस्तीस वर्षांपूर्वी झालेलं लेखन असूनही या नाटकाचा आशय आणि त्याची मांडणी इतकी कालातीत आहे की आजच्या इंटरनेटच्या जमान्यातल्या मुलांनाही खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य त्यात आहे.

सुप्रसिद्ध इंग्लिश नाटककार रॉबर्ट बोल्ट यांच्या ‘श्वार्टिंग ऑफ बॅरन बॉलिग्यू’ नाटकाचं हे स्वैर आणि पूर्ण मराठी तोंडवळा लाभलेलं रूपांतर.

बालमनाला थक्क करणं आणि त्याचवेळी त्यांना काही सद्‌गुणांची शिकवण देणं, या सूत्राभोवती या नाटकाची कथा गुंफण्यात आली आहे. ऐतिहासिक काळातून अद्भुतात घडलेला हा प्रवास आहे. चांगल्या माणसांना दैव साथ देतं, अन्यायाचा प्रतिकार केला, गोरगरीब-पशूपक्षी यांना मदत केली तर तेही तुमचे मित्र होतात आणि ऐन वेळी तुमच्या पाठीशी उभे राहतात, हे विश्वबंधुत्वाचं आणि माणुसकीचं तत्त्वज्ञान मुलांना शिकवणारं हे नाटक अनेक रोमहर्षक प्रसंगांनी भरलेलं आहे.

ISBN: 978-81-7185-953-5

Number of pages: 80

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2007