सफर : विजय तेंडुलकर

65.00 Original price was: ₹65.00.60.00Current price is: ₹60.00.
Sold out

Out of stock

Category:

Safar (सफर) – Vijay Tendulkar (विजय तेंडुलकर)

विजय तेंडुलकर यांच्या नाट्यप्रवासातील एक विशेष म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या आशयांबरोबर त्यांना योग्य अशा आविष्कारपद्धतींचा अवलंब केला किंवा त्या नव्याने निर्माण केल्या. सुरुवातीच्या ‘श्रीमंत’, ‘माणूस नावाचे बेट’ सारख्या नाटकांत त्यांनी पारंपरिक सामाजिक नाटकाचा ढाचा वापरला तर ‘सरी ग सरी’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘गिधाडे’ किंवा ‘विठ्ठला’ या नाटकांत आशयभिन्नतेनुसार वेगवेगळ्या आविष्कारपद्धती स्वीकारल्या.

‘सफर’ या नाटकातला अनुभव अनेकपदरी आहे. आपण ज्या ‘मूड’मध्ये हे नाटक वाचू, ऐकू किंवा पाहू त्यानुसार याची वेगवेगळी रूपे दिसू लागतील. वरवर पाहता ही एका काहीशा मतिमंद वाटणाऱ्या माणसाची काल्पनिक सायकल सफर आहे. या नाटकाकडे निखळ गंमत म्हणूनही पाहता येईल किंवा यातल्या घटनांमध्ये लपलेले अर्थही शोधता येतील, ही नुसती गंमत मानली तरी ती जाता जाता सबंध आयुष्याला गवसणी घालणारी.

विजय तेंडुलकर यांच्या ध्वनिफितीवरील वाचनात यातील बारकावे अधिक स्पष्ट होतात. या ‘ अनुभव नाटकाची’ ही संहिता.

ISBN: 978-81-7185-574-2

No. of pages: 45

Year of publication: 1991

Weight 0.071 kg
Dimensions 21.59 × 13.97 × 0.2 cm