श्रीमंत : विजय तेंडुलकर

135.00
Category:

Shreemant (श्रीमंत) – Vijay Tendulkar (विजय तेंडुलकर)

तेंडुलकरांच्या नाटकांचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे माणसाची माणूस म्हणून जगण्यासाठी चाललेली धडपड व्यक्त करणे. कधी ती स्त्रीची मुख्य व्यक्तिरेखा असते तर कधी पुरुषाची. या धडपडीतून निर्माण होणारी द्वंद्वे, अंतर्द्वद्वे ते रंगवत असले तरी त्यांचा रोख त्यापलीकडे असतो — तो म्हणजे माणसाला दुभंगणाऱ्या दुखःभोगातील अटळपणाकडे व असा अटळ दुखःभोग असूनही अटळ राहणाऱ्या माणसाच्या श्रद्धेकडे !
‘श्रीमंत’ नाटकात, श्रीमंती परंपरा-प्रतिष्ठा जपणाऱ्या एका कुटुंबात अपघाताने शिरलेला एक भणंग जुगारी, त्यामुळे त्या कुटुंबीयांना बसलेला हादरा व त्यामुळे त्यांची झालेली मानसिक उलथापालथ चित्रित झालेली आहे.
या उलथापालथीतून जसे एक विलक्षण व्यथित करणारे ‘नाट्य’ निर्माण झाले आहे तसेच ‘नाट्य’ दोन अहंतांच्या टकरीतूनही झाले आहे. या दोन अहंतांमधील एक अहंता माणसाला ठोकरणारी आहे तर दुसरी माणसाला शिरोधार्य मानणारी!!

ISBN: 978-81-7185-603-9

Number of pages: 96

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2015

 

Weight 0.084 kg
Dimensions 4.75 × 7 cm