Shivachi Saat Rahasye
भारतीय तत्त्वज्ञानाची बैठक समजावून देणारे आणि त्यातील शिवतत्त्वाचे विवेचन करणारे हे पुस्तक. ब्रह्मदेवाची पूजा का केली जात नाही, माया सृष्टी म्हणजे काय, असुर म्हणजे कोण, सागरमंथनाचा अर्थ काय, शिव, शंकर, रुद्र, भैरव, अशा शिवाच्या रूपांमधला फरक काय, शिवलिंग ह्या संकल्पनेचा अर्थ काय, शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा का घालता येत नाही अशा प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात मिळतात. तसेच गणेश या देवतेचा भारतीय कृषी जीवन, संपन्नता, सुबत्ता यांच्याशी कसा निकटचा संबंध आहे हे फार सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे. याच पद्धतीने कार्तिकेय, अय्यप्पा, खंडेराय, अर्धनारीश्वर, नटराज यांच्याविषयी आणि दुर्गा, काली, पार्वती, अन्नपूर्णा या शक्तीरूपी देवतेविषयी अधिक तपशीलवार माहिती मिळते.
ISBN: 978-81-7185-442-4
No. Of Pages: 234