व्रतस्थ ज्ञानसाधक : स. मा. गर्गे / कविता भालेराव

₹675.00 Original price was: ₹675.00.₹525.00Current price is: ₹525.00.

HungRy Up !

Offer end in :

Available on: November 10, 2026 at 12:00 am

व्रतस्थ ज्ञानसाधक : स. मा. गर्गे / कविता भालेराव (Vratastha Dnyansadhak : S. M. Garge / Kavita Bhalerao)

मराठवाड्यातील छोट्या खेड्यात जन्मलेला मुलगा. त्याने दारिद्र्य, अज्ञान, रोगराई, आणि अंधश्रद्धांचा अंधकार फार जवळून अनुभवला. ब्रिटिश आणि रझाकार अशा दोन्ही पारतंत्र्यात त्याची वयाची पंचवीस वर्षे अस्वस्थतेत आणि चाचपडण्यात गेली. रूढ अर्थाने या तरुणाला महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही, परंतु वडिलांनी लहानपणीच त्याच्या हातात पुस्तके वाचण्याची मिणमिणती पणती दिली होती. या जिद्दी मुलाने पुढील आयुष्यात तिचे ज्ञानज्योतीमध्ये रूपांतर केले. त्याने अनेक ज्ञानशाखांच्या अभ्यासाने ही ज्योत कमालीची उजळवली. नीटनेटक्या संसाराबरोबर ग्रंथवाचन, चिंतन, विश्लेषण, संपादन आणि लेखन हे त्याच्या आयुष्याचे भागधेय ठरले.

विलक्षण प्रतिभा, जिद्द आणि नित्य नवे करण्याची ऊर्मी यामुळे स. मा. गर्गे यांच्यामध्ये ज्ञानाचा एक वटवृक्ष वाढत राहिला, आणि त्याच्या शाखा विस्तारात गेल्या. शिक्षक, पत्रकार, इतिहास अभ्यासक आणि कोशकार अशी एक चढत्या भाजणीची दीर्घ वाटचाल स. मा. गर्गे यांनी केलेली आहे. बुद्धिप्रामाण्यवादावर दृढ विश्वास ठेवत केलेल्या या वाटचालीने त्यांनी महाराष्ट्राचे ज्ञानभांडार समृद्ध केले.

ज्ञानावरच्या सखोल निष्ठेने, ते सामाजिक शास्त्रांचा आणि इतिहासाचा अविचलपणे अभ्यास करत गेले. बघता बघता त्यांचेच एका ज्ञानपीठात कसे रूपांतर झाले? संदर्भ अडला की ‘समां’कडे जाऊन विचारावे, असे समीकरणच जणू त्यांच्या बाबतीत कसे निर्माण झाले? ग्रंथांच्या आणि अनेकविध व्यक्तींच्या सहवासाने त्यांच्या विचारांचा प्रवास कसा होत गेला? त्यांनी अनेक महत्त्वाचे लेखन-प्रकल्प कसे पूर्णत्वाला नेले?

या तपश्चर्येचा शोध म्हणजेच ज्ञानव्रती स. मा. गर्गे यांचे हे चरित्र! प्रेरणादायी आणि तितकेच उद्बोधकही

 

Weight 0.430 kg
Dimensions 21.59 × 13.97 × 1.8 cm
ISBN

978-81-993948-2-7

Pages

374

Binding

Paperback

Edition

1st Edition 2026

Cover Design

Milind Kadane