लिलीचे फूल Liliche Phool – Gangadhar Gadgil
एखाद्या यक्षभूमीसारख्या सुंदर निसर्गरम्य ठिकाणी ही कादंबरी घडते. कादंबरीची नायिका नीला बालकवींच्या फुलराणीसारखी नाजूक, निरागस आणि सुंदर आहे एखाद्या परीकथेतल्या राजकन्येसारखी. ही कादंबरी वर वर पाहता वास्तवाच्या, नित्य व्यवहाराच्या पातळीवर घडते; पण खरं म्हणजे ती एखाद्या दुःस्वप्नासारखी, नाइटमेअरसारखी आहे. ती परीकथेसारखी आहे आणि फिल्मी कथेसारखीदेखील आहे. ती एक नाजूक प्रीतिकथा आहे आणि थरकाप उडणारी रहस्यकथाही आहे. अनेक प्रकारे तेव्हाच्या किंवा नंतरच्याही मराठी कादंबऱ्यापेक्षा ही कादंबरी वेगळी होती. हा वेगळेपणा त्या कादंबरीतले वातावरण, पात्रांचं चित्रण, तिच्यातील मानसिक आणि नैतिक प्रश्न, घटनाक्रम, निवेदनशैली इत्यादी सर्वांतून व्यक्त होतो.
ISBN: 978-81-7185-591-9
Number of pages: 134
Year of Publication: 1955